युवकांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी अटल प्रतिष्ठान, माळशिरसच्यावतीने युवा विचार मंथनाचे आयोजन
निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव (म.) ता. माळशिरस, येथे अटल प्रतिष्ठान माळशिरस यांच्या वतीने युवकांच्या सकारात्मक भविष्याच्या वाटचालीस योग्य दिशा देण्यासाठी विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. १८, १९, २० मे २०२३ या तीन दिवशी मारुती मंदिरासमोरील प्रांगण, निमगाव (म.), ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
दि. १८/०५/२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ९ वा. हास्यकल्लोळ फेम दीपक देशपांडे यांचे “आनंदी जीवन” या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक प्रतापसिंह टकले हे असणार आहेत.
दि. १९/०५/२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ९ वा. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांचे “सामाजिक जीवनातील महिलांचा सहभाग” या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत समाजसेविका सौ. संस्कृतीताई सातपुते या असणार आहेत.
दि. २०/०५/२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ९ वा. भारत पाटील यांचे “समृद्ध गाव” या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर हे असणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९८६०१७२२४४, ९८२२६९७१७१, ९८९०५१६७४१ या नंबर वर संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त युवकांनी या युवा विचार मंथन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष के. के. पाटील व समस्त अटल प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng