येळीवच्या निंबाळकर कुटुंबाच्या देव्हाऱ्यातील देवासारखे हृदयातील देव आ. राम सातपुते झाले.
गोरगरिबांच्या दुःखात सहभागी होणारे राम सातपुते निंबाळकरांच्या कुटुंबाला राम भगवंताच्या रूपाने धावले – हर्षद निंबाळकर
माळशिरस ( बारामती झटका )
सर्वसामान्य व गोरगरिबांच्या अडचणीला व दुःखात सहभागी होणारे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते निंबाळकर कुटुंबाला राम भगवंताच्या रूपाने धावले आहेत. निंबाळकर कुटुंबाच्या देव्हाऱ्यातील देवासारखे हृदयातील देव माणूस आमदार राम सातपुते झाले आहेत, अशी हर्षद निंबाळकर यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संपर्क करून भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
हकीगत अशी आहे की, वडील सुभाष निंबाळकर यांना अचानक शुगरचा त्रास सुरू झाला. सुरुवातीस स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तपासणी केल्यानंतर शुगरचा हा त्रास म्युकर मायकोसिसमध्ये रूपांतर झाल्याचे तपासणीत समजले. संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली कारण या शस्त्रक्रियेसाठी दहा ते बारा लाख रुपये खर्च येणार होता. यावरील महागडी इंजेक्शन होती. संपूर्ण कुटुंब काळजीत होते. एवढा मोठा खर्च करायचा कसा आणि ऑपरेशन नाही केले तर मोठी अडचण होती.
अशा कठीण परिस्थितीत कुटुंब असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारात आशेचा किरण मिळाला. वडिलांच्या संपूर्ण आजाराची माहिती व परिस्थितीची व्यथा सांगितली. आमदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. वडिलांना घेऊन पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
सदर ठिकाणी यशस्वी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर माणसातील देव माणूस असणारे राम सातपुते यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन तब्येतीची विचारपूस केली. वडिलांनी प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे सांगितले. खऱ्या अर्थाने देव माणसाची रुग्ण सेवा ईश्वर सेवा आहे. वडिलांना माझ्या जन्माच्या वेळी जेवढा हर्ष झाला होता त्याहीपेक्षा आमदार राम सातपुते साहेब यांनी माझ्या वडिलांचा पुनर्रजन्म केल्या नंतर झाला आहे. अशा गोरगरीब व सर्व सामान्य जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी आमदार राम सातपुते यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng