रक्ताचं नातं आणि मानलेल्या नात्यात भेदभाव नसतो, समाजातील लोकांनी आदर्श घ्यावा असा लग्न सोहळा संपन्न झाला..
राम राज्यात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होती, त्याचाच प्रत्यय माळशिरसकरांना पहावयास मिळालेला आहे..
माळशिरस (बारामती झटका)
मानव जन्मामध्ये सोळा संस्कार महत्त्वाचे असतात. त्यापैकी आठवा संस्कार लग्न संस्कार असतो. लग्न म्हणजे आयुष्याला परिपूर्णता देणारा मंगल सोहळा. सनईची मंगल धुण, अंगणात रेखाटलेले स्वस्तिक, दारी आंब्याचे तोरण, हृदयात उमलून येणाऱ्या भावना, होमांचा धूर, सप्तपदी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सर्वांची एकच नजर शुभमंगल सावधानाकडे.
यामध्ये वधू-वरांमध्ये धरलेला आंतरपाट आणि पाठीमागे उभा असलेले मामा. या लग्न सोहळ्यातील लक्षवेधी असतात वधू-वरांच्या पाठीमागे रक्ताच्या नात्यातील मामा. उभे राहण्याचा मान असतो मात्र, रक्ताचं नातं आणि मानलेल्या नात्यात भेदभाव न करता समाजातील लोकांनी आदर्श घ्यावा असा शाही शुभविवाह सोहळा संपन्न झालेला आहे.फ
राम राज्यात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होती. त्याचाच प्रत्यय माळशिरसकरांना पहावयास मिळालेला आहे.
सौ. कल्पना व श्री. जयसिंग महादेव खांडेकर रा. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. अंकिता खांडेकर व श्रीमती छायाताई व स्वर्गीय लक्ष्मण निवृत्ती पुजारी रा. आंबेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली यांचे चिरंजीव सर्जेराव पुजारी यांचा गुरुवार दि. 11/05/2023 रोजी सायंकाळी 06 वाजून 48 मिनिटे या गोरज शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस अकलूज रोड 61 फाटा माळशिरस या ठिकाणी मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
विवाह सोहळे असेच होत असतात. मात्र, या विवाह सोहळ्यात नववधू चि. सौ. कां. अंकिता खांडेकर हिच्या पाठीमागे मामा म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पाठीशी उभे राहून उपस्थित सर्व लोकांचे लक्ष केंद्रित करून रक्ताचं नातं आणि मानलेल्या नात्यात भेदभाव नसतो समाजातील लोकांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीने लग्न सोहळा संपन्न झालेला आहे.
सदर लग्न सोहळ्याचे प्रेषक लोटेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंगळवेढा अर्बन बँकेचे संचालक श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव मारुती खांडेकर, गोरडवाडीचे माजी सरपंच लक्ष्मणतात्या जगन्नाथ गोरड, शिवाजीराव आबाजी मोटे (मामा), ॲड. शरदराव महादेव मदने ( मामा), श्री. जयसिंग महादेव खांडेकर प्रेषक होते.
ॲड. शरदराव महादेव मदने यांची नववधू चि. सौ. कां. अंकिता खांडेकर भाची आहे. मामा म्हणून शरदराव मदने यांना वधूच्या पाठीमागे उभा राहण्याचा मान होता. परंतु, जिवाभावाची मैत्री असणारे आमदार राम सातपुते यांच्याशी आमदार होण्याअगोदरपासून राम लक्ष्मणासारखी अतूट मैत्री आहे. राम सातपुते आमदार झाले तरीसुद्धा मैत्रीचं भावाभावाचं अतुट नातं जपण्याचे काम सुरू आहे. समाजामध्ये वधू-वरांच्या मामांचा मान नात्यागोत्यातील व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. मात्र, रक्ताच्या नात्या एवढेच मानलेलं नातं श्रेष्ठ आहे, असा आदर्श ॲड. शरदराव मदने यांनी समाजाला दिलेला आहे. पूर्वीच्या काळी राम राज्यात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. त्याचाच प्रत्यय माळशिरसकरांना पहावयास मिळालेला आहे. लग्नानंतर वरराजा असणारे सर्जेराव पुजारी यांना लोकप्रिय दमदार आमदार यांनी आशीर्वाद देऊन आमच्या भाचीचा व्यवस्थीत सांभाळ करा, या वाक्याने स्टेजवरील उपस्थितांना गहिवरून आलेले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The way you explained the topic is impressive. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?