रक्षणाकडून अर्थकारणाकडे संभाजी ब्रिगेडची भूमिका योग्य, मा. प्रदेशाध्यक्ष सुनील बाप्पा मोरे यांचे वक्तव्य
माढा तालुक्यातून सर्वाधिक तरुणांची संख्या उपस्थित राहणार
कुर्डूवाडी (बारामती झटका)
संभाजी ब्रिगेड ही संघटना तरुणांच्या युवकांच्या भविष्यासाठी लढणारी संघटना आहे. आमच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडचा लढा हा इतिहासाच्या आणि महापुरुषांच्या अस्मितेसाठी होता. इतिहासाची तोडफोड आणि इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना आम्ही अनेक वेळा धडा शिकवला. भंडारकरवर केलेली कारवाई ही आमच्या आयुष्यातली अविस्मरणीय कारवाई आहे. मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष असताना मेघडंबरीमध्ये रायगडावरती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवायला आमचे हात लागलेले आहेत. हे आमचे भाग्य समजतो. अनेक मोठमोठ्या कारवाया संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माझ्या हातून झाल्या. काळ बदलला आहे, स्पर्धेचे युग आहे. ज्याचा अर्थकारण मजबूत त्याचं वर्चस्व हे साधं सोपं गणित आहे. त्यामुळे समाजाने अर्थकारण सक्षमीकरणाकडे वळले पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी जी आरक्षणाकडून अर्थकारणाकडे चालू केलेली वाटचाल आहे, ती स्वागतार्ह आहे. तरुणांचं, कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर चळवळी टिकतील. आणि मराठा समाजातल्या बहुतांश चळवळी या अर्थकारण कोलमडल्यामुळे कोसळल्या आहेत. म्हणून आरक्षणाकडून अर्थकारणाकडे प्रविणदादा गायकवाड यांनी जी वाटचाल चालू केली ती अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील बाप्पा मोरे यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेड या संघटनेला 25 वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने मा. प्रदेशाध्यक्ष सुनिल बाप्पा मोरे यांची संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते हर्षल बागल यांनी भेट घेतली असता, विविध आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी माढा तालुका अध्यक्ष सौरभ भोसले व कुर्डूवाडी शहराध्यक्ष नवनाथ कडबाने उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड या संघटनेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुणे येथे 28 डिसेंबर रोजी संपन्न होणार असून या या अधिवेशनामध्ये सहज ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला, आरक्षणाकडून अर्थकरणाकडे, अशा विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित केली असून या अधिवेशनाला जास्तीत जास्त तरूणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला मी जाणार – संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रात मोठी ऐतिहासिक क्रांती केली आहे. जाती जातीतला व धर्म धर्मातला संघर्ष हा संभाजी ब्रिगेडने कमी केला, दंगली थांबवल्या. संभाजी ब्रिगेडने अनेक लेखक, वक्ते तयार केले. माझ्या कार्यकाळात अनेक मोठ्या ऐतिहासिक क्रांती घडल्या. आज प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आरक्षणाच्या पाठीमागे वेळ, पैसा आणि ताकद अनेक गोष्टी घालवत आहेत. आता समाजाला आर्थिक सक्षमीकरणाची गरज आहे आणि त्यासाठी प्रवीणदादांनी घेतलेलं अधिवेशन हे आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतीच पाऊल आहे. म्हणून मी स्वतः अधिवेशनाला जाणार आहे. – सुनिल बप्पा मोरे, (माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)
संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन हे अर्थक्रांतीचे पाऊल – आजपर्यंत या देशात अनेक संघटना व पक्ष झाले, पण त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कधीच आर्थिक सक्षमीकरणाचे धडे दिले नाहीत. पण संभाजी ब्रिगेड एकमेव संघटना आहे जी, आरक्षणाकडून अर्थकारण सक्षमीकरणाची वाटचाल करित आहे. बुधवारी होणारे रौप्यमहोत्सवी अधिवेशन हे अर्थक्रांतीचे पहिले पाऊल असेल. – हर्षल बागल, (संभाजी ब्रिगेड प्रवक्ते)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng