रणजितबापू युथ फाऊंडेशन, मळोली व फ्लोरा फर्निचर उद्योग समूहाकडून विठ्ठलभक्तांना ४ टन केळी व ५ हजार लस्सी वाटप
मळोली (बारामती झटका)
रणजितबापू युथ फाउंडेशन, मळोली व फ्लोरा उद्योग समूह, नातेपुते यांच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर या मार्गांवर चालणाऱ्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील विठ्ठल भक्तांना ४ टन केळी व ५ हजार थंडगार लस्सी पाउचचे वाटप करण्यात आले. मळोली येथील उद्योगपती श्री. मोहित जाधव हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. पायी चालणाऱ्या विठ्ठलभक्तांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी गेली अनेक वर्षापासून ते पालखी सोहळ्यात सामाजिक उपक्रम राबवित असतात.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २३ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर शंभू महादेवाच्या छायेत असलेली नातेपुतेनगरी विठ्ठलभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असते. पालखी सोहळ्याच्या अगोदर सकाळी सहा वाजल्यापासून विठ्ठलभक्त नातेपुते नगरीत दाखल होतात. या पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी, पोहे, सिरा, बेसन, भाकरी, सरबत आदी वस्तूंचे वाटप विविध संस्था व सामाजिक, राजकीय मंडळे करीत असतात. मात्र, ऐन उन्हात चालणाऱ्या भाविकांना उन्हाचा चटका कमी व्हावा व आरोग्यासाठी पोषक असणारे फळ वाटण्याचा संकल्प या उद्योग समूहाचे मालक श्री. मोहित जाधव यांनी केला असून आज नातेपुते नगरीत ते स्वतः विठ्ठलभक्तांची व माऊली भक्तांची सेवा करताना दिसून आले. या वर्षी पावसाने अपेक्षाभंग केल्याने अनेक वारकरी बांधवाना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये थंडगार लस्सी पिण्यास मिळाल्याने भक्तमंडळी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. श्री. रणजितसिंह जाधव युथ फाउंडेशन व फ्लोरा उद्योग समूह यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य श्री. माउली पाटील, श्री. मोहित जाधव, संतोष (आबा) वाघमोडे, अतुल (बापू) पाटील, अतुल बावकर, आप्पा पाटील रुपनवर, धनाजी (दाजी) राऊत, धनजी पांढरे, बाबा बोडरे, तेजस पाटील आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng