रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन संघाच्या चेअरमन पदी श्रीकांतकाका उर्फ शिवाजीराव देशमुख यांची निवड…
नूतन चेअरमन श्रीकांतकाका देशमुख यांचा पिसेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान संपन्न झाला..
पिसेवाडी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमन पदी वेळापूर पिसेवाडी गावचे प्रगतशील बागायतदार गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्रीकांतकाका उर्फ शिवाजीराव कल्याणराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल पिसेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी धनंजय विष्णू भाकरे, तानाजी सोपान सावंत, पांडुरंग राजाराम भाकरे, उमेश लक्ष्मण भाकरे, नवनाथ रंगनाथ भाकरे, प्रकाश चांगदेव पवार, नितीन बाळू सावंत, भीमराव नाळे, शंकर वसंत भाकरे, नूतन ग्रामपंचायत सदस्य रमेश लक्ष्मण भाकरे व कोमल प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांतकाका देशमुख उत्कृष्ट गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असून प्रगतशील बागायतदार आहेत, तसेच मोहिते पाटील यांचे निष्ठावान समर्थक आहेत. समाजामध्ये राजकारण व समाजकारण यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. पिसेवाडी पंचक्रोशीमध्ये त्यांच्या निवडीने आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यावेळी मित्रपरिवार यांच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng