रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूल व मथुराई प्रतिष्ठान येथे जागतिक महिला दिन, महिला मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
समाजसेविका सौ. संस्कृतीताई सातपुते आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योतीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार
मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, येथे रत्नाई इन्स्टिट्यूट मळोली संचलित रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूल व मथुराई प्रतिष्ठान मळोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन व महिला मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. ११/३/२०२३ रोजी दुपारी . ते संध्याकाळी ७ तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दि. १२/३/२०२३ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका सौ. संस्कृतीताई राम सातपुते आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योतीताई केशवराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वृषाली दिनेशसिंह शिंदे या असणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत आरटीओ ऑफिसर कु. अश्विनी बबन जगताप, उद्योग निरीक्षक सौ. दिपाली बाळासो केंगार, शेंडेचिंच ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उषा निवृत्ती राऊत, गारवाड (मगरवाडी) ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. नीता मामासो मगर पाटील, मळोली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. शैलजादेवी बळीराम जाधव, निमगाव (म.) ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. अर्चना गोरख मगर, मळोली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. रोहिणी किरण साठे, मळोली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. पार्वती शिवाजी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी महिलांसाठी उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, लिंबू चमचा, छत्रपती गीत, फनी गेम्स अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मळोली व परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूल व मथुराई प्रतिष्ठान मळोलीच्या अध्यक्षा सौ. अर्चना पवार आणि संस्थापक ॲड. श्री. राजेंद्र पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng