पंढरपुरात इक्विटास स्माल फायनान्स बँकेच्या फसवणूक प्रकरणी व्यवस्थापकासह २० जणांवर गुन्हा दाखल

बँकेचे कर्मचारी आणि कर्जदार यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ५३ लाखांचा अपहार केल्याची आरोप
पंढरपूर (बारामती झटका)
स्मॉल बँकिंग क्षेत्रात देशभरात शाखा विस्तार असलेल्या इक्विटास स्माल फायनान्स बँकेची पंढरपुरातही लिंक रोड येथे शाखा असून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जात आहे. यात स्थावर मालमता तारण कर्जाचे प्रमाण मोठे आहे. या प्रकरणी पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक राहीलेले अभिजित बनसोडे यांच्यासह इक्विटास स्माल फायनान्सचे पाच कर्मचारी आणि पंढरपूर तालुक्यातील १५ कर्जदार यांच्या विरोधात संगनमत करून खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून, खोट्या उताऱ्यावर मालक असल्याचे दर्शवून, ग्रामसेवक यांच्या खोट्या सही शिक्क्याचा वापर करून पंढरपूर दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग येथे उपस्थित राहून खोट्या बक्षीसपत्राचा व गहाण खताचा दस्त तयार करून करून इक्विटास स्माल फायनान्स बँकेची ५३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे एरिया मॅनेजर उमाकांत देशमाने यांनी दि. २५/१०/२०२५ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यात देण्यात आलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, पंढरपुरात सदर इक्विटास स्माल फायनान्स बँकेची शाखा असून या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून अभिजीत ग्यानबा बनसोडे, रा. रेल्वे स्टेशन शेजारी, पंढरपुर हे कार्यरत होते. 2) महेश बबन शेंडेकर रा. मु. पो. बड्डेगाव, औढी रोड, मोहोळ 3) सोमनाथ प्रकाश भोसले रा. मु. पो. पापरी, ता. मोहोळ 4) महादेव किसन खटकाळे रा. अकोला, वा. ता. सांगोला 5) अमोल देवेंद्र नादरगी रा. विडीघरकुल, हैद्राबाद रोड, सोलापुर हे कर्ज वितरण विभागात विविध जबाबदार कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गैरअर्जदार नं. 1 ते 5 यांनी अशा ग्राहकांकडुन KYC कर्जदाराचे उत्पन्न, व्यवसाय, मालमत्तेची कागदपत्रे, कर्जदाराकडुन गोळा करणे आणि सदर कर्ज प्रकरण गैरअर्जदार नं. 1 यांचेकडे सादर करण्याचे कामाचे स्वरुप होते. त्याचप्रमाणे क्र. 1 ते 5 यांचेकडे आलेल्या कर्ज प्रकरणांमध्ये सदर कर्ज प्रकरणांतील तारण मिळकतींना वैयक्तीक भेट देणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, कर्जदारांची KYC उत्पन्न आणि त्यांचे व्यवसाय इ. कागदपत्रांची पडताळणी करणे, ग्राहकांसोबत वयक्तीक चर्चा, सर्व मालमत्ता कर्जदारांचे उत्पन्न आणि व्यवसाय व इ. दस्तऐवज संबंधीत सरकारी प्राधिकरणाकडुन पडताळणी करणे, मिळकतीचे छायाचित्र घेणे त्यानुसार अहवाल बँकेच्या सिस्टीममध्ये पाठविणे, कायदेशीर अहवाल ( Search Riport) घेणे, कायदेशीर अहवाल प्राप्त केल्यानंतर दिलेल्या अहवालावर विसंबुन राहुन फिर्यादी बँक प्रकरणे मंजुर करुन कर्ज वितरीत करण्याची कार्यपद्धती आहे. मात्र, सदर बँकेचे व्यवस्थापक व वर नमूद इतर चार कर्मचारी यांनी ग्राहकांशी संगनमत करुन (गैरअर्जदारांनी) जे खोटे बनावट कागदपत्र तयार करुन मालक नसताना खोट्या उताऱ्यावर मालक असल्याचे दर्शवुन ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या व शिक्के असलेले कागदपत्र तयार करुन याखाली नमुद गैरअर्जदारांनी ते कागदपत्र वर नमुद 1 ते 5 या गैरअर्जदारांकडे सादर केले व त्यानंतर त्यांनी बँकेचे जे नियमाने कर्ज दिले जाते त्या सर्व नियमांची त्यांनी पायमल्ली केली व त्यामुळे खाली नमुद गैरअर्जदारांनी फिर्यादी कंपनीकडुन कर्ज रक्कम उकळलेली आहे. याशिवाय सदर खोट्या कागदपत्रांचा उपयोग करुन मा. दुय्यम निबंधक 2 पंढरपुर यांचे कार्यालयात उपस्थित राहुन खोटा व बेकायदेशीर असा बक्षिस पत्राचा दस्त तयार करुन फिर्यादी कंपनीला गहाण खत लिहून दिलेले आहे. या खाली नमुद ग्राहकांचे गैरअर्जदारांचे कर्ज रक्कम थकीत झालेनंतर फिर्यादी कंपनीतर्फे अधिकारी यांनी सदर कामे वैयक्तीकरित्या व व्यक्तिशा मे 2025 मध्ये चौकशी केली असता सदर बाब निदर्शनास आली असून कर्जप्रकरणाशी संबंधित मिळकतीच्या ठिकाणी जाऊन अधिक चौकशी व पडताळणी केली असता गैरप्रकार उघडकीस आलेला आहे.
इक्विटास स्माल फायनान्स बँकेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कर्जदार १ ) सुप्रिया अजित घाडगे व सह कर्जदार अजित औदुंबर घाडगे दोघे रा. शिरगाव पोस्ट, ओझेवाडी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, कर्ज खाते नं. 700007573302 कर्ज रक्कम 9,90,000 (नऊ लाख नव्वद हजार) दि. 04/09/2023, २) सुरेखा मोहन मडके व सहकर्जदार मोहन सदाशिव पाटील व सहकर्जदार राहुल मोहन पाटील सर्व रा. तिसंगी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज खाते नं. 700009389877 कर्ज रक्कम 5,70,000 (पाच लाख सत्तर हजार), दि. 04/09/2023, ३) सुवर्णा कांतीलाल पाटील व सह कर्जदार कांतीलाल माणिक पाटील दोघे रा. तिसंगी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज खाते नं 700009403650 कर्ज रक्कम 6,00,000 (सहा लाख) दि. 30/04/2024,४), गोकुळा अंकुश घोगरे व सहकर्जदार अंकुश सिद्राम घोगरे दोघे रा. तिसंगी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज खाते नं 700009524995 कर्ज रक्कम 8,00,000 (आठ लाख) दि. 27/05/2024 ५) शरद महादेव पवार व सहकर्जदार लक्ष्मी महादेव पवार दोघे रा. तिसंगी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज खाते नं. 700009651249 कर्ज रक्कम 7,50,000 (सात लाख पन्नास हजार) दि. 30/06/2024, ६) विशाल मायाप्पा पाटील व सह कर्जदार सुजाता विशाल पाटील दोघे रा. तिसंगी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज खाते नं 700009875544 कर्ज रक्कम 8,50,000 ( आठ लाख पन्नास हजार) दि. 29/07/2024 ७) वैशाली औदुंबर रुपनर सहकर्जदार नामे औदुंबर संभाजी रुपनर दोघे रा. तिसंगी, पोस्ट सोनके, ता. पंढरपुर, जि. सोलापुर कर्ज रक्कम 7,90,000 ( सात लाख नव्वद हजार) असे एकूण १५ कर्जदार व सह कर्जदार तसेच इक्विटास स्माल फायनान्स बँकेचे कर्मचारी यांनी संगनमत करुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार करुन मालक नसताना खोट्या उताऱ्यावर मालक असल्याचे दर्शवुन ग्रामसेवक यांचे खोट्या सह्या व शिक्के असलेले कागदपत्र तयार करुन मा. दुय्यम निबंधक वर्ग 2 पंढरपुर यांचे कार्यालयात उपस्थित राहुन खोटा व बेकायदेशीर असे बक्षिसपत्राचा व गहाण खताचा दस्त तयार करुन दस्त फिर्यादी कंपनीला लिहून एकूण रक्कम 53,50,000 ( त्रेपन्न लाख पन्नास हजार रु.) चा अपहार केल्याच्या फिर्यादीनुसार यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४),कलम ३१८(४),कलम ३३८,३३६(३),३४०(१),३४०(२),३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी बँक व्यवस्थापक पदी कार्यरत राहिलेले क्रमांक १ चे आरोपी अभिजीत बनसोडे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती तर पुढे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सदर आरोपीने न्यायालयासमोर जामीन अर्ज ठेवला होता परंतु सदरचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तर या प्रकरणी इतर आरोपी व बोगस कागदपत्रे सादर करून अपहार केल्याप्रकरणी इतर आरोपीवर काय कारवाई होणार हे आता पहावे लागेल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



