ताज्या बातम्या

रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. बबनदादा शिंदे यांच्या मागणीची दखल घेतली.

स्पेस डिव्हायडरचा अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

दिल्ली (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय पाटील यांनी माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व माढा लोकसभेचे पाणीदार कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा तालुक्यातील भीमानगर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील बंद करण्यात आलेला स्पेस डीव्हायडर सुरु करण्याबाबतचे पत्र दिले होते. ते पत्र खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय सडक परिवहन तथा, राज्यमार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांना दिले होते. याची दखल घेत मंत्री नितीनजी गडकरी यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. स्पेस डीव्हायडर सुरु करण्यात येणार असल्याचा शब्द केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिला आहे.

सदर पत्रात असे म्हटले आहे कि, माढा तालुक्यातील मौजे भिमानगर येथे उजनी धरण असून येथे मोठी शासकीय वसाहत व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आहे. तसेच बँक ऑफ इंडिया व डीसीसी बँकेची शाखा असून भिमानगर व परिसरातील शेतकऱ्यांना बँकेचे कामकाज करण्यासाठी सतत ये-जा करावी लागते. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेण्यासाठी भीमानगर येथे यावे लागते. भीमानगर येथील डिव्हायडर दि. २५/७/२०२३ रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची, शेतकरी व नागरिक यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे स्पेस डिव्हायडर बंद होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने ठराव करून रस्ता रोको आंदोलन केले होते. तरी भीमानगर येथील स्पेस डिव्हायडर त्वरित सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

या पत्राची दखल घेत केंद्रीय सडक परिवहन तथा, राज्यमार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये शिष्टमंडळाला शब्द दिला आहे.

यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, जिल्हा दूध संघाचे चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भावी आमदार रणजीतभैय्या शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय पाटील, ज्येष्ठ नेते राजकुमार पाटील अकोलेकर आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button