Uncategorized

राजवीर शिंदे रंगभरण स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ यांनी भरवलेल्या रंगभरण स्पर्धेमध्ये सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथील इयत्ता सहावीत शिकत असलेला कुमार राजवीर मनोज शिंदे यांने सोलापूर जिल्ह्यात रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले आहे.

राजवीरला चित्रकलेबरोबर गडकिल्ले करण्याची आवड आहे. त्याने सह्याद्रीतील लोहगड, विसापूर, तैलाबैल, मोरोशीचा भैरवगड, गोरखगड अशा मोहिमा पूर्ण केल्या आहेत. राजवीरला त्याचे वडील मनोज शिंदे यांचे नेहमी प्रोत्साहन असते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, संचालिका कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील व मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रेय घंटे यांनी राजवीर शिंदे याचे कौतुक करून त्याचा गौरव केला. राजवीरला चित्रकला विभाग प्रमुख दत्ता शिंदे, कलाशिक्षक तानाजी काशीद व कलाशिक्षक सिद्धनाथ टिंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. राजवीरच्या या यशाबद्दल त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button