ताज्या बातम्याशैक्षणिक

माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशालेतील पर्यवेक्षक श्री. रामचंद्र शेंडगे यांची सेवानिवृत्ती

माळशिरस (बारामती झटका)

गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय माळशिरस येथील पर्यवेक्षक श्री. रामचंद्र दगडू शेंडगे हे सेवानिवृत्त होत आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने ते तीस वर्ष एक महिना आणि सोळा दिवस केलेल्या सेवेतून ते आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या आयुष्यावर टाकलेला एक प्रकाशझोत…

कै. दगडू पांडुरंग शेंडगे व कै. शेषाबाई दगडू शेंडगे यांचे कनिष्ठ सुपुत्र श्री. रामचंद्र दगडू शेंडगे हे माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांच्या सेवेनंतर ते आता सेवानिवृत्त होत आहे. रामचंद्र शिंदे यांचा जन्म दि. ०१/०८/१९६५ साली सगरवाडी, कन्हेर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरगरवाडी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय माणकी येथे झाले. त्यानंतरचे संपूर्ण शिक्षण त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून कमवा व शिका या योजनेतून पूर्ण केले. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले.

श्री. रामचंद्र शेंडगे यांच्या पत्नी मनीषा यांनी देखील मोलाची साथ दिली. जीवनाचा रथ पती-पत्नीनी सुस्थितीत चालविला‌. त्यांना सुरज आणि स्नेहल अशी दोन मुले आहेत. तर सून निकिता आणि जावई श्रीनिवास आहे. असा त्यांचा हा छोटासा परिवार आहे.

श्री. रामचंद्र दगडू शेंडगे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व सुसंस्कृत आहे. सहकार्याची भावना आणि आपुलकी यामुळे त्यांनी परिसरात आणि महाविद्यालयात अनेक माणसे जोडली. त्यांनी समाजात आणि शाळेत स्वतःचे असे स्थान निर्माण केले. शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडविले. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. रामचंद्र दगडू शेंडगे यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort