राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार यांची नियुक्ती
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुनेत्राताई पवार यांच्यासह आठ खासदार तालिका अध्यक्षपदी असतील आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड तसेच उपाध्यक्ष हरिवंश यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या कामकाजाचे संचालन करतील.
या आठ खासदारांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनेत्राताई पवार यांच्यासह, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव, भाजपच्या खासदार किरण चौधरी आणि संगीता यादव या चार महिला खासदार तसेच भाजपचे खासदार घनश्याम तिवारी, डॉ. दिनेश शर्मा, द्रमुकचे पी. विल्सन आणि आम आदमी पक्षाचे विक्रमजितसिंग साहनी या खासदारांची तालिकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.