राज्यस्तरीय युवा नेतृत्व पुरस्काराने ॲड. सुनिता धनंजय पाटील सन्मानित
माळशिरस (बारामती झटका)
कन्हेर (ता. माळशिरस) गावच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सुनिता धनंजय पाटील यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा गौरव म्हणून अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघ युवा राज्यस्तरीय पुरस्कार ॲड. सुनिता धनंजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी समाजातील विविध संघटनांचा महत्त्वाच्या पदावर त्यांनी महाराष्ट्रभर काम केलेले आहे. मानवाधिकार कमिटी, पश्चिम महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्लेसमेंट माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना मोठ्या कंपन्या व एअरपोर्टला नोकरी मिळवून दिली व जागतिक कोरोना महामारीच्या काळात असंख्य गोरगरीब लोकांना अन्नदान कीट वाटप केले, विधवा, अनाथ महिलांना पेन्शन मिळवून दिली, अपंगांना अपंग सर्टिफिकेट मिळवून देऊन नोकरी मिळवून दिली, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी पास मदत केंद्राशी बोलून पास मिळवून दिले, खेळाच्या स्पर्धांमध्ये पुरस्कार दिले.
माळशिरस तालुक्यातील महिला बचत गटांना घरगुती व मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन केले. पंढरपूर व माळशिरस तालक्यातील विविध शैक्षणिक संस्थामध्ये विनामूल्य समोपदेशन केले. माळशिरस तालुक्यातील गावांमधे श्री श्री रविशंकर यांचे बाल चेतना शिबिर राबविले, अशा विविध केलेल्या कामांमुळे सामाजिक, खेळ, शैक्षणिक व राजकारणातील गोरगरिबांचे प्रश्न घेऊन नेहमी गोरगरिबांना न्याय देण्याचे काम ॲड. सुनिता धनंजय पाटील यांच्यामार्फत करण्यात आले.
या सर्व केलेल्या कामाची दखल पत्रकार संघटनेने घेऊन ॲड. सुनिता धनंजय पाटील यांना राज्यस्तरीय युवा 2022 चा पुरस्कार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय पत्रकार संघ व युवा परिषदेचा ॲड. सुनिता धनंजय पाटील यांना राज्यस्तरीय युवा नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर, पंचक्रोशीतील ॲड. सुनिता धनंजय पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

तसेच अनेक मान्यवरांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या. या विशेष गौरव सोहळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, प्रशांत जगताप, शैलेंद्र चव्हाण, राजेश वरालेकर, अमोल तोरणे, शेखर गोत्सुरवे, ॲड. सुनिता धनंजय पाटील यांचे सासरे माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, आंबादास पाटील यांच्या परिवारातील सदस्य प्रमुख कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम पुणे येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कॅम्प परिसर येथे सोहळा उत्साहात संपन्न झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng