Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

राज्यातील साखर कारखान्याचे धुराडे झाली बंद, साखर उत्पादनात मोठी घट – कुबेर जाधव

नाशिक (बारामती झटका)

तब्बल सात महिने सुरू असलेल्या सर्वच साखर कारखान्याचे गाळप आटोपलं आहे. उस टंचाईमुळे सन २२/२३ च्या गाळप हंगामात गत वर्षीच्या तुलनेत २१,१/२ ते २२ लाख टन गाळप कमी झाले आहे. २१० साखर कारखान्यांनी गाळप केले, त्यात ५०% कारखाने खासगी तर ५०% कारखाने हे सहकार तत्वावर आधारित आहेत. यावर्षी साखरेच्या उताऱ्यातही घट झाली असून या वर्षी ९.९८% साखर उतारा मिळवत १०५४:७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०५:२७ लाख क्विंटल साखर निर्मिती केली. गेल्या हंगामात १२७:५३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. म्हणजे गत वर्षीच्या तुलनेने साखरेचं उत्पादनही २२ लाख क्विंटलने कमी झाले आहे. याचा अर्थ उस उत्पादनात व साखर उत्पादनात २०% घट झाल्याचे दिसून येते. साखर उताऱ्यात ४४% घट झाली आहे. सर्वाधिक २३.५४% लाख क्विंटल साखर निर्मिती कोल्हापूर विभागाने करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ३.४८ लाख क्विंटल साखर निर्मिती करून शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. यावर्षी उस उत्पादनात घट होण्याचे प्रमुख कारण मागील वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात उसाची वाढ खुंटली. त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाला आहे.

सन २०२२ ते २०२३ या हंगामातील खास वैशिष्ट्ये –
अ) सर्वाधिक साखर उतारा मिळवणारे ५ कारखाने
१) पंचगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर १२.८६% साखर उतारा
२) राजाराम बापू सह, साखर कारखाना युनिट २ सांगली १२.८४%
३) राजाराम बापू सहकारी वाटेगाव सुरुल, सांगली १२.८०%
४) कुंबी कासारी सह, साखर कारखाना, कोल्हापूर १२.७२% ५) दुधगंगा सहकारी साखर कारखाना कोल्हापूर १२.६२ % उतारा मिळवत पाचव्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात पक्ष्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने हे अव्वल स्थानी आहेत.

ब) सर्वाधिक गाळप ‌करणारे ५ कारखाने आकडेवारी क्विंटलमध्ये १्) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा १८ लाख ४१ हजार क्विंटल २) गुरू कम्युनिटी जरांडेश्वर, सातारा १८ लाख १८ हजार क्विंटल ३) जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना हुपरी १८ लाख १ हजार क्विंटल ४) बारामती अग्रो इंदापूर पुणे १६ लाख ४३ हजार क्विंटल ५) इंडिकांन डेव्हलपर्स, श्री अंबिका शुगर्स अहमदनगर १५ लाख ४४ हजार क्विंटल

क) सर्वाधिक साखर उत्तपादन घेणारे ५ साखर कारखाने १) जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना २२लाख ७ हजार क्विंटल २) गुरू कम्युनिटी जरांडेश्वर, सातारा १८ लाख २६ हजार क्विंटल ३) विठ्ठल रामजी शिंदे सहकारी सोलापूर १६ लाख ५२ हजार क्विंटल ४) इंडीकाम, श्री अंबिका शुगर्स अह.नगर १६ लाख ३५ हजार क्विंटल ५) श्री तात्यासाहेब कोरे सह. साखर कारखाना कोल्हापूर १४ लाख ७२ हजार क्विंटल. साखर आयुक्त कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सदरचा लेखाजोखा मांडला आहे. – कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button