शिक्षणापासून दुर्बल व वंचित असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना, पालकांना न्याय मिळण्यासाठी दशरथ पवार यांचे गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव

…अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार…
बारामती (बारामती झटका)
बारामती येथील श्री. दशरथ साहेबराव पवार यांनी विविध मागण्यांसाठी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, बारामती यांना निवेदन दिले आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या काही पालकांनी जाणीवपूर्वक खोटा निवासी पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल /पोस्टपेड बिल, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व पासपोर्ट ही कागदपत्रे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पत्त्यावर बनवून घेतली आहेत. म्हणून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या परंतु वरील कागदपत्रे भाडेतत्त्वावर राहण्याचा निवासी पुरावा देणाऱ्या पालकांचे राहत्या घराचा १ कि.मी. च्या आतील गुगल मॅप लोकेशन/पत्ता/स्पॉट व्हेरिफिकेशन व्हावे, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यानगरी या शाळेतील आरटीई २५% रिझर्वेशन २०२४-२०२५ अंतर्गत जाहीर झालेल्या मूळ निवड यादीतील सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची राहत्या घराचा १ कि.मी. च्या आतील गुगल मॅप लोकेशन/पत्ता/स्पॉट व्हेरिफिकेशन होण्याबाबत, कारण काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी खोटे गुगल मॅप लोकेशन दिले आहे. तसेच रहिवाशाचा/वास्तव्याचा/भाडेकरार/निवासी पुरावा हा आरटीई चा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा आहे का ?, याचे व्हेरिफिकेशन व्हावे, पालकांचे उत्पन्नाचा दाखला व चालूचे खरे उत्पन्न याचे व्हेरिफिकेशन व्हावे, जन्मदाखला व डिसेबिलिटी सर्टिफिकेट याचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन व्हावे, ज्या विद्यार्थ्यांची खोटी माहिती आढळून आली आहे त्या विद्यार्थ्यांचे आरटीई २५% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात यावेत, ही सर्व माहिती लेखी स्वरूपात मिळण्याबाबत दशरथ पवार यांनी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आरटीई २५% रिझर्वेशन २०२४-२०२५ साठी वरील नमूद केलेल्या शाळेत जाहीर झालेल्या मूळ निवड यादीतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी नातेवाईक, मित्र व ओळखीच्या लोकांच्या राहत्या घराचा १ कि. मी. च्या आतील गुगल मॅप लोकेशन व पत्ता याचा जाणीवपूर्वक खोटा पुरावा आरटीई ऍडमिशन साठी दिलेला असून त्याचे स्पॉट व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. तसेच शाळेत जाहीर झालेल्या मूळ निवड यादीतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे रहिवाशाचा/वास्तव्याचा/भाडेकरार/निवासी पुरावा हा आरटीई चा फॉर्म भरण्याच्या तारखेनंतरचे असण्याची दाट शक्यता आहे. आणि केवळ प्रवेश मिळवण्याच्या हेतूने १ कि.मी. च्या आतील खोटे पुरावे तयार केले आहेत. त्यामुळे त्यांचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. वरील शाळेत जाहीर झालेल्या मूळ निवड यादीतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्नाचा दाखला व चालूचे खरे उत्पन्न यामध्ये तफावत असण्याची दाट शक्यता आहे. आणि जाणीवपूर्वक उत्पन्नाचा खोटा पुरावा आरटीई ऍडमिशनसाठी दिला आहे. त्यामुळे खरे उत्पन्नाचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. जन्म प्रमाणपत्र व डिसेबिलिटी सर्टिफिकेट मधील खरी माहिती तपासण्यासाठी ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. कारण काही विद्यार्थ्यांचे पालक आरटीई ऍडमिशनसाठी जाणीवपूर्वक खोट्या सर्टिफिकेटचा पुरावा देतात. म्हणून शिक्षणापासून दुर्बल व वंचित असणाऱ्या स्थानिक व गरीब विद्यार्थ्यांना, पालकांना न्याय मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी व ज्या विद्यार्थ्यांची खोटी माहिती आढळून आली आहे त्या विद्यार्थ्यांचे आरटीई २५% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात यावेत व ही सर्व माहिती वेळोवेळी लेखी स्वरूपात मिळावी. तसेच तातडीने कार्यवाही न झाल्यास दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर दुपारी १.३० वा. उपोषणाला बसणार असल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

श्री. दशरथ पवार यांचा हा लढा शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे. गट शिक्षण अधिकारी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती शिक्षण अधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगरी बारामती, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रशासन अधिकारी, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे – १, गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती, तहसीलदार बारामती, उपविभागीय अधिकारी बारामती, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी बारामती, यांना देण्यात आल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



