राष्ट्रवादीचे नेते उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन कार्ड कॅम्प
मांडवे (बारामती झटका)
प्लस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट यांच्या नियोजनातून मांडवे या ठिकाणी लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालय माळशिरस यांच्यावतीने रेशन कार्ड कॅम्प तसेच सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले.
यावेळी मांडवे गावचे तलाठी प्रवीण उदगावे भाऊसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मांडवे गावचे माजी सरपंच श्री. ज्ञानेश्वर (भाऊ) पालवे पाटील तसेच माजी सरपंच राहुल (नाना) दुधाळ, सरपंच हनुमंत टेळे, उपसरपंच रामभाऊ गायकवाड, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुधाळ, सुनील खुडे, निजाम मुलाणी, पिनू पालवे, राजू शिंदे, संजय शिंदे, सहदेव खोमणे, विठ्ठल पालवे, राष्ट्रवादीचे नेते हनुमंतराव साळुंखे पाटील, अमोल शिंदे, महादेव वाघमोडे, तुषार कोळेकर व सर्व विठ्ठल पालवे मित्रपरिवार उपस्थित होता.
या वेळी रेशनकार्ड नावे वाढवणे 76 कामे, नाव कमी करणे 47 कामे, खराब रेशनकार्ड 40 कामे, रेशन मिळत नाही 276 प्रकरणे, जातीचे उत्पन्न नोंद करणे व डोमासाईल 70 कामे इ. कामे करण्यात आली. सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज नेत्र तपासणी 279 नागरिकांची तपासणी झाली व 22 नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर लता मोरे, डॉक्टर रवींद्र बाबर व जनसेवक विकी भिसे, प्रमोद मिसाळ, बुद्धभूषण बनसोडे, गणेश नामदास, रोहित धाईंजे, नागेश सकट विठ्ठल पालवे मित्रपरिवार मांडवे यांच्या विशेष सहकार्याने हा कॅम्प संपन्न झाला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was a fascinating read. The points made were very compelling. Lets discuss further. Check out my profile for more engaging content!