राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका सरचिटणीस तुषार पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम….
राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक तुषार पाटील यांनी पक्षाचे पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असल्याने माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी युवकांची फळी खिळखिळी..
नातेपुते ( बारामती झटका )
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका सरचिटणीस तुषार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांचे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील युवकांचे संघटन असणारे कारूंडे गावचे युवा नेते तुषार पाटील यांनी राजीनामा दिलेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी खिळखिळी झालेली आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तुषार पाटील यांनी जोमाने काम करून तळागाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे रुजविण्याचे काम केलेले आहे.
पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक होते. तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसमध्ये तडफदार नेता म्हणून तुषार पाटील यांच्याकडे पाहिले जात होते. स्पष्ट व परखड अशी त्यांची ओळख होती. अचानक राजीनामा दिलेला असल्याने माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये खळबळ माजलेली आहे. राजीनाम्याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून कोणता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतील याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने लग्नाच्या वाढदिवसाला राजकीय पक्षाचा राजीनामा देऊन आजच्या दिवस सर्वांच्या लक्षामध्ये राहण्यासारखा झालेला आहे. लवकरच बारामती झटका परिवार त्यांच्याशी संपर्क साधून भविष्यामधील रणनीती जाणून घेतली जाणार आहे. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व व सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng