राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी वेळापूर येथे भक्तिमय वातावरण संपन्न होणार.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे भजन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन
भाविकांनी लाभ घेण्याचे, तालुकाध्यक्ष नितीनभैया चौगुले यांचे आवाहन
वेळापूर ( बारामती झटका )
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी रविवार दि. 01/01/2023 रोजी असल्याने संत गाडगेबाबा युवक संघटना माळशिरस तालुका व वेळापूर शहराच्या वतीने भक्तीमय वातावरणात सालाबादप्रमाणे साजरी करण्यात येणार आहे.
वेळापूर येथे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये भजन होणार आहे. 12 नंतर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी सहपरिवार, मित्रपरिवार, नातेवाईक व समाज बांधव यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रसंत गाडगेबाबा युवक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष व उघडेवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य नितीनभैय्या चौगुले, वेळापूर शहराध्यक्ष नवनाथ वाघमारे, देविदास लोंढे, दशरथ अडसूळ, अवधूत वाघमारे, नवले गुरुजी, ननवरे सर, बाबुराव ननवरे, संजय सोनटक्के, विपुल राऊत, शैलेश राक्षे, साळुंखे साहेब, बंटी वाघमारे, अशोक उर्फ बन्या वाघमारे व वेळापूर पंचक्रोशीतील सर्व परीट समाजबांधव यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!