Uncategorizedताज्या बातम्या

राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांना बीजेनिमित्त विनम्र अभिवादन – सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते

नातेपुते (बारामती झटका)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात संत तुकाराम महाराजांचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, आहार-विहार, नितीमुल्य, कर्म, आचरण, वैद्यकिय महत्व सर्व परिचित आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून शेती संबंधी शेतकरीबंधूना शेती व शेती काम संबंधी वेळ, कर्म, प्राधान्य, काळ यांचे महत्व विषद केले आहे. त्या अभंगांना अन्यन्यसाधरण महत्व आहे.

. मढे झाकुनिया करिती पेरणी ! जयासी कावले नरदेह ! ओटीच्या परिस मुठीचे ते वाढ ! या परि कैवाळे स्वहिताचे ! नाही कळा सत्ता अपुलिये हाती ! जाणते हे गुता ऊगवली ! तुका म्हणे ! पाही आपुली सुचना ! करी तो शहाणा मृत्यलोकी ! – दिलेल्या नरदेहाचा उपयोग करून घरातील कोणी वारले तरी शेतात वेळेवर शेती कामे करण्याचे महत्व विषद केले आहे. वेळ व काळ आपल्या हातात नाही म्हणून कर्म करत रहा कर्माच्या सिद्धांत विषद केला आहे.

२. मिरासीचे म्हण शेत नाही देत ! पीक उगे खोल पडे ते पीक उत्तम ! – योग्य खोलीवर व ओलीवर पेरलेले बीयाणे चांगले उगवून चांगले उत्पादन देते.

३. गोमट्या बीजाची फळेही ही गोमटी ! – शुद्ध बिया चा वापर करा फळे रसाळ गोमटी येतील.

४. जीवनेविना पीक नव्हे नव्हे जाण ओले मुळ भेदी खडकाचे अंग ! – पाण्याविना पीक नाही वाढ नाही उत्पन्न नाही व ओलीशिवाय मुळ वाढत नाही.

५. न काढीता तण ! कैचे येती कण हाताशी ते ! तण खाई धन !! – शेत पीक तणमुक्त ठेवा.

६. झाडेमुळे जीव सोईरे पाषाणा, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे !! – वृक्ष पाषाण पशु पक्षी शेतक्याचे सोयरे आहेत त्यांना जपा, जगा आणि जगू दया.

७. शेती आले सुगी, सांभाळावे चारी कोण पिकविले तया खाणे किती !! – सुगीत पीक आले त्याचा सांभाळ करा मग चांगले पिकेल.

८. घरी मोकडीया बाजा वरी वाकळांच्या शेजा, आनंदाचे अंग आनंदाचे !! – अशाप्रकारे शेती व संलग्न क्षेत्रात वेळेवर सर्व कामे केली पाहीजेत. कर्म प्रथम ! या उक्तीप्रमाणे वेळेवर ओलीवर जगा आणि जगू दया ! नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून प्रथम प्राधान्य शेती व शेती पुरक व्यवसाय केले तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, हे युग युग पूर्व काळात संत तुकाराम महारांजाना यांनी संबोधले होते व त्याचा प्रत्यक्ष वापर करणे ही काळाची गरज आहे व त्याचा अवलंब करणे हेच जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजेला खरे अभिवादन ठरेल.

जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची मानावा !! पुंडलीक वरदे, हरी विठठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ! जगतगुरु तुकाराम महाराज की जय हो !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button