राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अकलूजच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ
अकलूज (बारामती झटका)
कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी उत्कृष्टपणे काम पाहिल्याबद्दल गौरा फाउंडेशन पुणे आयोजित सेलेस्ट्रियल ब्युटी अँड हिरोईक मॅन ऑफ ग्रेट भारत च्या वतीने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेते व प्रसिद्ध मॉडेल रजनीश दुग्गल, गौरी नाईक, जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतभरातून या स्पर्धेसाठी 300 ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. यामधून 45 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. विवाहित महिला, मुली व विवाहित पुरुष यांच्यासाठी या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये मिस गटामध्ये कोलकाता पश्चिम बंगालमधील टीटास चॅटर्जी हिने प्रथम क्रमांक पटकावला, मिसेस गटामध्ये नयना बोडके नाशिक यांनी तर मिस्टर गटामध्ये उस्मानाबाद महाराष्ट्रातील आरिफ अली कोटवाल हे विजेते ठरले. विशेष म्हणजे मिसेस गटामध्ये नाशिक येथील विजेत्या ठरलेल्या नयना बोडके या दिव्यांग असूनही चार फेरीमध्ये एक हात नसतानाही या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरल्या. याबद्दल त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे. या स्पर्धांसाठी स्पॉन्सर म्हणून संजय घोडावत ग्रुप व संजय पाटील हे होते. तर या स्पर्धेच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचा धनादेश शिक्षणासाठी देण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन संदीप पाटील व स्वाती बलते यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле