Uncategorized

राहूल काळे नातेपुते यांचा ऑक्टोबरमध्ये द्राक्ष उत्पादनाचा अभिनव यशस्वी प्रयोग – श्री. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

सद्यस्थितीत हवामान बदल, हंगाम बदल, सतत पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता, तापमानातील चढउतार, अचानक पडणारे धुके, अतिवृष्टी, वाऱ्यांची दिशा व वेग, निसर्गाचा लहरीपणा इत्यादी हवामान घटक बाबींमधील बदलामुळे द्राक्ष उत्पादन घेणे बेभरोशाचे झाले आहे. यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांनी द्राक्ष पिक बदल करून केळी, सिताफळ पेरु, आंबा या पिकाकडे मोर्चा वळविला आहे. याला प्रत्यय म्हणून तरुण कृषि पदविधर शेतकरी केलेल्या प्रयत्नांने विक्रमी उत्पादनामुळे आशेचा किरण व उत्साह निर्माण झाले शिवाय राहणार नाही. नातेपुते गावामधील कृषि पदविधर सधन कुटूंबात जन्मलेल्या जन्मतः शेतीची नाळ असलेले तरुण तडफदार यूवा शेतकरी श्री‌ राहुल राजेन्द्र काळे यांनी हवामान घटक बाब निर्सगाचा लहरीपणावर मात करून दिपावली पाडव्याला विक्रमी उत्पादन व उच्चांकी भाव यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी बंधूचा उत्साह व प्रेरणा द्विगुणीत झाल्या आहेत. यांनी हवामान घटक व बदल, निसर्गाचा लहरीपणा यावर मात करून विक्रमी उच्च प्रतिचे द्राक्ष उत्पादन करण्याचा चंग बांधला व यासाठी घरच्या वडीलधारी मंडळींचा आर्शिवाद मार्गदर्शन व अर्थसहाय्य लाभले. उपलब्ध ज्ञान, कृषि विभाग मार्गदर्शन यांचा जुगाड करून हंगामपूर्व द्राक्ष बाजारात आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व त्याचे यश आज आपण बघत आहोत.

राहुल काळे यांनी ९ फुट x ४ फुट वर कृष्णा सिडलेस – ३ एकर क्षेत्रावर व माणिक चमन – २ एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली. सर्वप्रथम उच्च प्रतिची द्राक्ष बाजारात उपलब्ध करून उच्च भाव मिळविणेसाठी खालीलप्रमाणे नियोजन व त्याचे आयोजन केले. यासाठी मंडळ कृषी अधिकारी, नातेपुते कार्यालयाचे सहकार्य लाभले. यासाठी हवामान घटक व बाबी बदल व लहरी निसर्ग यापासून पूर्णतः संरक्षीत द्राक्ष उत्पादनाचा प्रेरणादायी अभिनव प्रयोग शत प्रतिशत जोखीम घेऊन हाती घेतला. द्राक्ष पिक वाढ व उत्पादनावर आर्द्रता, थ्रीप्स, भुरी, अतिवृष्टी, सततचा पाऊस, जादाचे पाणी, धुके, वारा निसर्ग लहरीपणा, पशुपक्षी यांचा उपद्रव, फळधारणे वेळचा पाऊस यावर मात व संरक्षीत करून हंगामपूर्व उत्पादन घेणेसाठी १५ जुलै दोन्ही जातीची खरड छाटणी केली व बहार धरण्याचे नियोजन केले. १. अवेळी पाऊस, सतत पाऊस, अतिवृष्टी – यावर उपाय व यापासून संरक्षणासाठी द्राक्ष बागेची खरड छाटणीनंतर ३ ते ५ दिवसांनी द्राक्ष बाग वेलीवरती ४ फुट उंचीवर ९० जीएसएम पॉलीथीन नैसर्गिक पारदर्शकता असणारा पांढऱ्या रंगाचा कागद आच्छादन केला. यासाठी अँगल व वरील तार व अर्धवर्तुळाकार पेपर आच्छादनासाठी अतिरिक्त रु. १.५० लाख खर्च आला. ९ फुट रुंदीचा कागद ३ रु. प्रति स्वे. फुट प्रमाणे एकरासाठी ४० हजार स्के. फुट कागदासाठी १ लाख २० हजार रुपये खर्चून वेलीवरती आच्छादन केले. यामुळे सतत पाऊस, अतिवृष्टी, गारपीट यामुळे द्राक्ष घड मणी वेली फळ धारणा इत्यादी वेळची जोखीम शुन्य झाली. २. अतिरिक्त पावसाचे अतिवृष्टीचे सततच्या पावसाचे पाणी व आर्द्रता पासून संरक्षण – द्राक्ष वेलीवरील आच्छादनावरील पाणी वाहून नेणे व जमिनितील पाण्याचे वाफेच्या स्वरूपातील उर्त्सन वाढणारी आर्द्रता व यामुळे होणारी भुरी तसेच जमिनीतील अतिरिक्त पाणी शोषणामुळे गर्भ धड जिरणे, मण्याचे चिरणे यावर उपाय म्हणून दोन ओळीमधील मोकळ्या जमिनिला १% उतार उत्तर दिशेला नैसर्गिक गुरुत्वाकर्षन दिशेने देऊन मध्यभागी छोटी नाळ तयार करून मधील जागेत अर्धगोल आकार देऊन ५० मायक्रोन सिल्व्हर जामिनिवरील आच्छादन पसरविले. यासाठी ५ बंडल ८ फुट रुंदीचा १२०० फुट लांबीचा मल्चिग पेपर ३ हजार प्रति बंडल १५ हजार खर्च झाला. यामुळे द्राक्ष वेलीवरील आच्छादनावरील पडणारे पाणी या पेपरद्वारे वाहून गेले. यामुळे द्राक्ष बाग वेलीचे अतिरिकत पाण्यामुळे संरक्षण होऊन नुकसान टळले. ३ – थ्रीप्स, धुके, वारा यापासून बागेचे संरक्षण – यासाठी बागेच्या सभोवती ८०% शेडनेट व जमिनीलगत जुन्या साड्यांचा वापर करून वाराप्रतिबंधक धुके प्रतिबंधक व थ्रीप्स प्रतिबंधात्मक म्हणून वापर केल्यामुळे यापासून बागेचं संरक्षण झाले. यासाठी एकरी १० रुपये खर्च झाला.

वरील प्रमाणे द्राक्ष बागेचे वेलीचे पिकाचे संरक्षीत शेती पद्धतीचा वापर केल्याने बागेच्या प्रति फवारणी ५ हजार प्रमाणे २० फवारण्याचा १ लाख खर्च बचत झाली. वेलीवरती प्लास्टिक आच्छादनामुळे अन्टीबर्ड नेट ५ हजार व ५ हजार मजूरी वाचली. या संरक्षीत शेती पद्धतीचा वापर केल्याने द्राक्ष पीकाचे वेलीचे अतिरिक्त पाणीमुळे घड जिरणे, घड चिरणे थांबले. भुरीपासून संरक्षण होऊन पीक संरक्षण खर्चात बचत झाली व एकसारखे मणी घड निर्मिती होऊन घड मण्याची चकाकी, लस्टर रंगछटा नैसर्गिक रित्या आबाधीत राहील्या व पक्षी वटवाघूळ यापासून बागेचे संरक्षण झाले . या संरक्षीत शेती पद्धतीचा वापर करून १ एकर बागेत १२०० झाडावर प्रत्येकी उजवीकडे १५ घड व डावीकडे १५ घड ३५० ते ४०० ग्रॅम वजनाचे जोपासून प्रति झाड १० -१२ किलो द्राक्ष ऑक्टोबर दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर विक्रीस उपलब्ध झाली . या बागेतील सरसकट सर्व माल केरळच्या व्यापाऱ्यांने प्रतिकिलो १४५ रु प्रमाणे करार भाव दिला व एकरी १७ लाख ४० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले . आहे ना गर्वाची स्वाभीमानाची कष्टांची प्रयत्नाची गोष्ट ! खर्च व नफा याचा विचार करता बागेचे वेलीचे प्लॅस्टिक आच्छादन १.५० लाख अंगल तार स्टील वर्क – १ .५० लाख ‘जमिनिवरील आच्छादन व बसविणे२०हजार रुपये ‘ बागे भोवतालचे प्रतिबंधक पट्टा १५ हजार अशा प्रकारे ३ .५० अतिरिकत खर्च एकरी अपेक्षीत Iआहे व या अतिरिकत खर्चामुळे फवारणी खर्च १ लाख . औन्टीबर्ड नेट १० हजार यांची बचत होउनी एकरी हुकमी १० लाख उत्पादन मिळाले . याचबरोबर हवामान घटक बाबी व लहरीप्णामुळे होणारे८०% पयेत होणारे नुकसान टाळणे शक्य झाले. शेतकरी बांधवांनी हंगामपूर्व किंवा नियमित हंगाम मध्ये शाश्वत द्राक्ष उत्पादन घ्यावयाचे असेल तर या संरक्षीत शेती पद्धतीचा वापर करणे काळाची गरज आहे. तरी शेतकरी बांधवांनी खचून न जाता उपलब्ध व आधूनिक तंत्रज्ञान व जुगाड चा वापर करून द्राक्ष पिकावर व उत्पादनावर होणारा लहरी हवामान ‘हवामान घटक ‘ बाबीचा प्रतिकृल परिणाम या संरक्षीत शेती पद्धतीचा वापर करून प्रतिकृल परिणामावर मात करून विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. सर्वसाधरण नवीन शेतकरी बांधवांना हा खर्च अतिरिक्त असून भार सहन करण्याची शक्ती कमी आहे यामुळे पंचक्रोशीतील द्राक्ष बागायतदार याने याबाबत ‘ घटकासाठी ५०% अनुदानाची मागणी करत आहेत तरी शासन दरबारी याचा विचार होणेबाबत शेतकरी वर्गातून अपेक्षा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Back to top button