रोहित उर्फ बादल सोरटे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी निवड.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वांवर बादल सोरटे यांची वाटचाल सुरू
नातेपुते ( बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील आंबेडकरी चळवळीतील सुशिक्षित व सुसंस्कृत युवा नेते रोहित उर्फ बादल सोरटे यांची पुनश्च रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी निवड ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष अशोकदादा सरवदे यांच्यावतीने पक्षाच्या जिल्हा बैठकीत नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहित उर्फ बादल सोरटे यांचे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात गेली बारा वर्षे झाली पक्षाचे काम एकनिष्ठ सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना समाजातील घटकांना सामावून घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबवून घेतले जातात. समाजामध्ये समाज प्रबोधन करून समाजात जनजागृती करण्यासाठी कायम प्रयत्न करत आहेत. पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असते. कार्यातून समाजामध्ये बादल यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या घोष वाक्याचा प्रत्यय येत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत संघटन वाचविण्याचे काम सुरू आहे. समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे. त्यांनी सुरवातीला डीएड केले, नंतर बीए केलेले असून सध्या एल. एल. बी. प्रियदर्शनी लाॅ काॅलेज फलटण येथे शिक्षण घेत आहेत.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यात रोहित उर्फ बादल सोरटे यांचे कार्य सुरू आहे. पुनश्च तालुका सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे, निश्चितपणे संधीचे सोने करून पक्षाचे काम जोमाने करावे, यासाठी बारामती झटका परिवार यांचेकडून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
