लक्षवेधी बातमी : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे हर्षुभाऊ भाजपमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झाले.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दूध आंदोलनाला रस्त्यावर, दूध वाटणाऱ्या भाऊंची दुधाची बरोबरी ताकाने सुद्धा केली नाही, ताकाचे भांडे खंगळून दिले, अशी अवस्था भाजपने केली
इंदापूर ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार संसदीय कार्यमंत्री अशा अनेक खात्याचा कॅबिनेट मंत्री पदावर काम केलेले इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते हर्षवर्धन पाटील उर्फ भाऊ काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या खात्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत काँग्रेस पक्ष ज्येष्ठांच्या यादीत गेलेले होते. मुख्यमंत्रीच्या शर्यतीमध्ये भाऊंचे नाव येत होते. काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीवर घेतलेले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार होते. सरकारच्या विरोधात दूध आंदोलनात रस्त्यावर दूध वाटणाऱ्या भाऊंची दुधाचीसुद्धा बरोबरी ताकाने केलेली नाही, ताकाचे भांडे खंगळून दिले, अशी अवस्था भाजपने केलेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती सांभाळणार्या भाऊंची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गणना केली जात होती. काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने भाऊंच्या योग्य मान सन्मान करतील मंत्रिमंडळातील दांडगा अनुभव असल्याने मंत्रिमंडळात स्थान देतील किंवा इतर महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळेल, असे कार्यकर्त्यासह इंदापूरच्या जनतेच्या मनामध्ये होते. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य करून भाऊंच्या समर्थकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. भाजपमध्ये आल्यानंतर भाऊंना चांगली झोप लागते परंतु भाजपने योग्य सन्मान न केल्याने कार्यकर्त्यांची व समर्थकांची झोप उडालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng