लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
अकलूज (बारामती झटका)
लवंग (२५/४) ता. माळशिरस येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देभभक्तीपर गीत गाऊन व देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करून उपस्थित ग्रामस्थांना व पालकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलात राहुन २१ वर्षे देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण केलेले माजी सैनिक सिकंदर हुसेन शेख (गणेशगांव) यांच्या शुभहस्ते ध्वजाची पूजा करून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी तिरंग्यास सलामी दिल्यांनतर शाळेतील चिमुकल्यानी ऐ मेरे वतन के लोगो, आय लव्ह माय इंडिया, हम बच्चे हिंदुस्थान के, या देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केली. तसेच इंग्लिश भाषेतून देशभक्ती विषयीचा आदर व्यक्त करीत गावकऱ्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत भाषणे करीत उपस्तिथांची मने जिंकली.
तसेच यावेळी युवा पर्व लवंग यांच्यामर्फत लवंग परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिकंदर हुसेन शेख म्हणाले, आम्ही दहावीत गेलो तरी आम्हाला इंग्रजी वाचायला व लिहायला आणी बोलता तर येतच नव्हते. त्या काळात शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागरूकता नव्हती. परंतु, आजच्या स्पर्धेच्या युगात पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या प्रगतीविषयी जागरूक झालेले पहायला दिसत आहेत. या शाळेतील केवळ तीन, चार, पाच वर्षांची मुले उत्तम इंग्लिश बोलत आहेत. स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष समाधान जगताप, उपाध्यक्ष दशरथ दगडे, असलम काझी, सोमनाथ राऊत, विकास चव्हाण, रेवन भोळे, भीमराव शिंदे, भारत सरवदे, निलेश वाघ, रेडे पाटील, चैतन्य मेडिकल यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्दीन शेख, गुलशन नशीब शेख, रुबीना नौशाद शेख, मोईन फकृद्दीन शेख, महादेव कोळेकर, रमेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng