ताज्या बातम्यासामाजिक

पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक रशीद तांबोळी अपघाती निधन

बार्शी (बारामती झटका) अनिल देशपांडे यांजकडून

बार्शी तालुक्यातील पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक श्री. रशीद आब्बास तांबोळी यांचे काल आपघाती निधन झाले.

श्री. तांबोळी हे कासारवाडी रस्त्यावरून सायंकाळी जात असताना अज्ञात वाहनांच्या धडकेने गाडीवरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना तातडीने बार्शीतील भगवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मात्र, रविवारी रात्री त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी श्री. तांबोळी यांचे वय ४५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे. बार्शी पंचायत समितीमधील एक कामसू व मनमिळावू कर्मचारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्यावर करमाळा तालुक्यातील गौडरे तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button