लिंगायत समाजासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळ झाल्यामुळे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
करमाळा (बारामती झटका)
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी केले आहे, असे मत लिंगायत समाजाच्या बैठकीत व्यक्त करून शिंदे-फडणवीस यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. यावेळी खोलेश्वर मंदिरातील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.
करमाळा लिंगायत समाजाच्यावतीने समाजाची बैठक घेऊन देवेंद्र फडवणीस व एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून पेढे वाटण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेना शहर प्रमुख शीलवंत, मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे, शिवकुमार चिवटे, जय युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे, बाळासाहेब महाजन, संजय महाजन, अभय महाजन, शेखर स्वामी, किरण स्वामी, संतोष माऊली, विशाल गुळवे, सचिन माहुले, मनोज पाटणे, राजेंद्र पाटणेकर, सचिन साखरे, विजयकुमार राक्षे, गणेश ममदापूर, सचिन शहापुरे, भारत माऊली, राजेंद्र माऊली, चंद्रशेखर शीलवंत, कमलादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, चंद्रशेखर राजमाने, सुधीर राजमाने, विकास राजमाने, चंद्रकांत कारंडे, अजय षडाक्षरी, सुनील विभुते आदी वीरशैव समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी लिंगायत समाजाच्या मुलांना एक लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत उद्योग धंद्यासाठी कर्ज मिळणार असून या आर्थिक महामंडळामुळे लिंगायत समाजातील तरुण मुले स्वतःच्या पायावर उभारून उद्योग व्यवसाय उभा करतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng