लोकनेते स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन
बागेचीवाडी (बारामती झटका)
बागेचीवाडी ता. माळशिरस येथे लोकनेते स्वर्गीय दत्तात्रय (आप्पा) रघुनाथ वाघमारे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि. २१ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता प्रतिमा पूजन, सकाळी ९ ते १२ भजन आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन वाघमारे परिवार, समाज बांधव व मित्रपरिवार यांच्यावतीने वाघमारे वस्ती, बागेचीवाडी, येथे करण्यात आले आहे.

तसेच बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लोकनेते स्व. दत्ता वाघमारे यांची पुण्यतिथी व गुढीपाडव्यानिमित्त जय महाराष्ट्र गणेश तरुण मंडळ, ननवरे वस्ती, खळवे यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा जार किंवा हेल्मेट यापैकी कोणतीही एक वस्तू रक्तदात्याच्या इच्छेनुसार भेट म्हणून दिली जाईल. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच लोकनेते स्व. दत्तात्रय (आप्पा) रघुनाथ वाघमारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी निकाली कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. जास्तीत जास्त कुस्ती शौकीनांनी मल्ल प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng