Uncategorizedताज्या बातम्या

लोकप्रिय आ. राम सातपुते यांनी फळवणीचे माजी सरपंच माधवराव अवताडे पाटील यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली…

स्वर्गीय माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपणारे, गोरगरिबांचा व दीनदुबळ्यांचा आधारवड काळाच्या पडद्याआड.

फळवणी ( बारामती झटका )

फळवणी ता. माळशिरस, माजी सरपंच माधवराव एकनाथराव अवताडे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अवताडे पाटील परिवार यांच्या दुःखात सहभागी होऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयराव पवार, येळीव गावचे युवा नेते हर्षदराजे निंबाळकर तसेच अवताडे पाटील परिवारातील सदस्य, नातेवाईक व फळवणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील स्वर्गीय माजी मंत्री गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचारांचा वारसा जपणारे माधवराव अवताडे पाटील उर्फ अण्णा गोरगरिबांचा व दीनदुबळ्यांचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. माजी सरपंच माधवराव अवताडे पाटील यांना अण्णा या टोपण नावाने ओळखत होते. अण्णांनी फळवणी गावचा सर्वांगीण विकास केलेला आहे. राजकारण करीत असताना सर्वसामान्य जनता यांना कधीही राजकीय व आकस बुद्धीने वागणूक दिलेली नाही. साधी राहणी व स्वच्छ विचारसरणी अशा तत्त्वावर अण्णांचे राजकारण होते. पूर्वी माळशिरस तालुक्यातील 14 गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती. त्यावेळेला स्वर्गीय माजी मंत्री गणपतआबा देशमुख यांच्या विचारांवर प्रेरित होऊन गावांमध्ये व पंचक्रोशीत अण्णांनी काम करीत असताना गणपत आबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. संपत्तीचा कधीही गर्व नव्हता. अण्णा गणपत आबांना भेटण्याकरता एसटीने सांगोला येथे जात असत. अण्णांनी गावातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला अडचणीमध्ये मदत केलेली आहे. समोरचा व्यक्ती आपल्या विचाराचा किंवा विरोधी विचाराचा, असे कधीही पाहिले नाही. अण्णांच्या शेतामध्ये कोणीही जाऊन वैरण, गवत आणत असत. विहिरीचे पाणी कोणीही नेत अस. कधीही अण्णांच्या व अवताडे पाटील परिवारातील सदस्यांनी जनतेला सहकार्य केलेले आहे. अडचणीच्या काळात मदत केलेली असल्याने अण्णांच्या जाण्याने फक्त अवताडे परिवार यांनाच दुःख झाले असे नाही तर गोरगरिबांचा व दीनदुबळ्यांचा आधारवड काळाच्या पडद्याआड गेलेला असल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अण्णांच्या परिवारांची भेट घेऊन अण्णांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले होते. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माजी सरपंच माधवराव अवताडे पाटील यांच्या घरामध्ये प्रवेश करताच अण्णांच्या कार्याची आठवण येऊन उपस्थितांचे डोळे पाणावले होते, कंठ दाटून आलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

  1. [u]porn pics gifs[/u] – [url=http://gifssex.com/]http://gifsex.ru/[/url]

    About porn GIF ‚lan gif by virtue of regard payment free. Assort porn gifs, GIF dash is a solely on means of b functioning as to look after the excellent set up of any porn video stop sweet without seem in the heap up of credible gait pictures.

    [url=http://gifsex.ru/]http://gifssex.com/[/url]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button