लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची नवयुग क्रीडा मंडळाच्या स्पर्धेच्या उपस्थितीने राजकीय नवयुगाच्या पर्वाला सुरुवात.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख यांच्यावतीने सन्मान.
माळशिरस ( बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी नवयुग क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेला भेट देऊन खेळाचा आनंद लुटला. यावेळी नवयुग क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख यांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा सन्मान केला. दमदार आमदार राम सातपुते यांच्या नवयुग क्रीडा मंडळाच्या स्पर्धेच्या उपस्थितीने राजकीय नवयुगाच्या पर्वाला सुरुवात नव्याने झालेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
कैलासवासी रामचंद्र बाबासो देशमुख ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व कैलासवासी पैलवान ज्ञानदेव गोपाळ देशमुख यांचे स्मरणार्थ नवयुग क्रीडा मंडळ माळशिरस यांच्यावतीने अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेला गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी सुरुवात झालेली आहे. नवयुग क्रीडा मंडळाच्या वतीने गेल्या २५ वर्षापेक्षा जास्त वर्ष या मंडळाकडून क्रिकेट व शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करून मोठ्या रकमेचे बक्षीस व आरडी चषक दिला जातो.
नवयुग क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये आजपर्यंत आजी माजी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती असते. मात्र, माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच माळशिरस विधानसभेचे लोकप्रतिनिधी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची उपस्थिती लाभलेली आहे. आ. राम सातपुते यांनी उपस्थित खेळाडूंचा परिचय करून घेऊन शूटिंग बॉल खेळण्याचा आनंद लुटला. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कार्याच्या स्वकर्तृत्वातून मतदार संघात त्यांना विविध कार्यक्रमात बोलावून मान सन्मान दिला जातो. मात्र, राजकीय वेगळ्या विचाराच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा राम सातपुते यांनी कार्यातून आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
नवयुग क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा तुकारामभाऊ देशमुख यांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीसाठी आमंत्रित केलेले होते. आमदार राम सातपुते यांनी आमंत्रणाचा स्वीकार करून कार्यक्रमास खास आवर्जून उपस्थिती दर्शवली. त्यावेळेस त्यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर उपस्थित होते. त्यामुळे नवयुग क्रीडा मंडळाच्या स्पर्धेच्या उपस्थितीने राजकीय नवयुगाच्या पर्वाला नवीन सुरुवात झाली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your breakdown of the topic is commendable. For further reading, here’s a useful resource: READ MORE. Let’s discuss!
Muchas gracias. ?Como puedo iniciar sesion?