Uncategorizedताज्या बातम्या

फुलचंद नागटिळक यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

नगर (बारामती झटका)

निमगाव वाघा येथील स्व. पै. किसनराव बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रती गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे फुलचंद नागटिळक यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा यांचा वेश परिधान करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. व्यसनमुक्ती, हरितक्रांती, शेतकरी वाचवा, सामाजिक समरसता, किर्तन, प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहात. म्हणून फुलचंद नागटिळक यांना निमगाव वाघा येथील स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” देण्यात येणार आहे. असे निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य तथा स्व. पै. किसनराव डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. अहमदनगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता न्यू मिलन मंगल कार्यालयात होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button