लोकसभा व विधानसभा निवडणुकीत योग्य “नियोजन” केल्यामुळे,के. के. पाटील यांची जिल्हा “नियोजन” समितीच्या सदस्य पदी नियुक्ती
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. श्रीकांतजी भारतीय, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संधी मिळाली
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ. श्रीकांतजी भारतीय, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नामुळे आणि माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा निवडणुकीत योग्य नियोजन केल्यामुळे माजी पंचायत समिती सदस्य व सोलापूर जिल्ह्याचे सह प्रभारी प्रांतिक सदस्य केशवराव कृष्णराव पाटील उर्फ के. के. पाटील यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नेमणूक करून निष्ठेने व प्रामाणिकपणाने पक्षाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्याबद्दल यथोचित मानसन्मान देऊन जिल्हा नियोजन समितीवर के. के पाटील यांची नियुक्ती केलेली आहे.
माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या विरोधामधूनच के. के. पाटील यांच्या राजकारणाला सुरुवात झालेली असून अद्यापपर्यंत सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील 14 गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेली असल्याने या गावांवर शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य होते. विधानसभेला फक्त सांगोला तालुक्याला जोडलेली गावे, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात असत. 1995 साली शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर के. के. पाटील माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीत उभे राहिले. दणदणीत मतांनी विजयी झालेले होते. विशेष म्हणजे अकरा सदस्य मोहिते पाटील आणि अकरा सदस्य भाजप शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले होते. त्यावेळेस प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या विरोधात पंचायत समितीमध्ये विरोधी गटाचे उपसभापती अंबादासभाऊ पाटील यांना संधी मिळालेली होती. ती संधी देत असताना के. के. पाटील पंचायत समितीचे सदस्य या नात्याने साक्षीदार होते.
के. के पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात माळशिरस तालुक्यात गट बांधणी केलेली होती. मोहिते पाटील गटाच्या विरोधात माळशिरस पंचायत समितीचे तीन वेळा सदस्य होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. पंचायत समिती गण आरक्षित झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत महिला सर्वसाधारण जागेवर धर्मपत्नी सौ. ज्योतीताई पाटील यांना निवडून आणलेले होते. ज्योतीताई पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये स्टॅंडिंग कमिटीवर काम केलेले आहे. के. के. पाटील आणि सौ. ज्योतीताई पाटील या पती-पत्नीने निमगाव पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. रस्ते, लाईट व पाणी अशा समस्यांसमवेत व्यक्तिगत लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेले आहेत. स्थानिक आमदार विरोधी असताना के. के. पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्याकडून अनेक लोकोपयोगी कामे करून घेतलेली आहेत. अनेक वर्षापासून रखडलेला निमगाव-मळोली रस्ता विशेष प्रयत्नातून मंजूर केलेला होता.
माळशिरस तालुक्यात अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून के. के. पाटील यांनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून सोडवलेल्या आहेत.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यामध्ये अनेक शिलेदार आहेत त्यापैकी एक के. के. पाटील आहेत. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा खासदार व आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखाचे लीड व माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांच्या विजयामध्ये के के. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा व विधानसभेचे पडद्यामागील चाणक्य विधान परिषदेचे आ. श्रीकांतजी भारतीय यांनी माळशिरस तालुक्यात विशेष गनिमी काव्याने रणनीती लढवलेली होती. त्यामध्ये के. के. पाटील यांचा सहभाग मोठा होता. श्रीकांतजी भारतीय यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी असताना श्रीकांत भारतीय यांनी केलेले आहे. के. के. पाटील यांची भाजपवरील निष्ठा, प्रेम व वरिष्ठांनी दिलेली यशस्वी जबाबदारी पार पाडलेली असल्याने के. के. पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य केलेले आहे.
निमगाव (म.) ग्रामपंचायत पहिल्यांदाच भाजपच्या विचाराची ग्रामपंचायत असल्याने के. के. पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन राजकीय ताकद दिलेली आहे. के. के. पाटील यांच्या निवडीने समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती अशी पदे झाली, आता एकच पद उरले, ते ही भविष्यात मिळो हीच, बारामती झटका परिवार यांच्याकडून अपेक्षा…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng