Uncategorizedताज्या बातम्या

लोणंद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस साजरा

लोणंद (बारामती झटका)

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे – २०२३ व स्वातत्र्यांचा अमृत महोत्सव चे औचित्य साधून तृणधान्य वर्षे व भोगी तृणधान्य दिन, हॉर्टशॅप, डाळिंब शेतशाळा वर्ग – ४, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत पीक प्रात्यक्षिक शास्त्रज्ञ भेट व प्रक्षेत्र भेट चे आयोजन लोणंद या गावी करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र – मोहोळ येथील विषय विशेषज्ञ शास्त्रज्ञ सौ. काजल मात्रे यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे व तृणधान दिन, भोगी या दिवशी पौष्टीक बाजरी, ज्वारी, राळे, वरई, भगर या पिकाचे लागवड व आहारातील महत्व याबाबत माहिती उपस्थितीत शेतकरी यांना साध्या भाषेत माहिती दिली.

श्री. सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी यांनी तृणधान्य व पोषण तत्व, मुल्य व प्रक्रिया पदार्थ व विविध आजावरील उपाय याबाबत चर्चा केली. उपस्थिती लाभार्थी सह मौजे लोणंद येथील गहु या पिकासंबंधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत निविष्ठासह बियाणे वाटप केलेल्या श्री. बाळू गंगाराम कोन्हाळे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्लॉटवर जाऊन वाढीच्या अवस्था व उत्पादन वाढीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन शास्त्रज्ञ व प्रक्षेत्र भेटीत करण्यात आले. तसेच श्री. शिवाजी बाजीराव रुपनवर प्रक्षेत्रावर मका क्रॉपसॅप अंतर्गत लष्करी अळी एकात्मिक नियंत्रण याबाबत प्रात्यक्षिक व सल्ला देण्यात आला.

याचबरोबर श्री. रणजीत नाळे यांचे हॉर्टशॅप, फिक्स प्लॉट श्री. धनाजी मच्छीद्र खुडे लोणंद यांचे हस्त बहार डाळिंब प्लॉट वर शेतीशाळेचा ५ वा वर्ग घेण्यात आला. या वर्गात शास्त्रज्ञ सौ. काजल मात्रे यांनी डाळींब एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन बाबत माहिती दिली. या वर्गात श्री. रणजीत नाळे यांनी एकाल्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमांत श्री. गोरख पांढरे कृषि पर्यवेक्षक यांनी शेतकरी अपघात विमा याबाबत माहीती दिली. या संयुक्त कार्यक्रमातचे सुत्रसंचालन श्री. यु. टी. साळूंखे यांनी केले व कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार शब्द सुमनाने श्री. विश्वनाथ दुधाळ कृ. स. नातेपुते यांनी केले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ५२ बांधवांनी उपस्थिती नोंदवली व चहा पान व नाष्ट्याने कार्यक्रमांची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button