Uncategorizedताज्या बातम्या

वटफळी गावचे श्री संपतराव बाळासाहेब वगरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

ग्रामविकास अधिकारी हनुमंतराव वगरे यांना पितृशोक.

माळशिरस ( बारामती झटका )

वटपळी गावचे श्री. संपतराव बाळासाहेब वगरे यांचे आज रविवार दि. 18/12/2022 रोजी दुपारी 3.30 वा. पुणे येथे रुबी हॉलमध्ये हृदय विकारावरील उपचार सुरू असताना वयाच्या 80 व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, चार नातू, चार नाती असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी हनुमंतराव वगरे यांचे ते वडील होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात त्यांनी चाळीस वर्ष नोकरी केलेली आहे. विशेष म्हणजे वटफळी ते अकलूज अंतर सायकलवर उन्हा पावसाचे दिवस असताना खडतर प्रवास करून दोन मुलांना उच्चशिक्षित केलेले आहे. एक मुलगा प्राध्यापक आहे तर, दुसरा मुलगा ग्रामविकास अधिकारी आहे. सुसंस्कृत स्वभाव, साधी राहणी, उच्च विचारसरणी, सर्व समाजामध्ये मिळून मिसळून ते राहत असत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे संपतराव वगरे वर्गमित्र होते. विजय दादांच्या उपस्थितीमध्ये वयाची 75 वी वर्षाची अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आलेला होता.

मुलांप्रमाणे नातवांवर प्रेम होते. नातवांच्या शिक्षणाबद्दल अभिमान असत. पत्नी जिजाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत अखंडपणे दादांना साथ दिलेली होती. स्वतःचा विचार कधीही न करता मुलांचा व नातवांच्या भवितव्यासाठी ओढ होती. असे सर्वगुणसंपन्न असणारे संपतराव वगरे उर्फ दादा यांच्यावर वटपळी येथे राहत्या घराशेजारी आज सायंकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादांच्या मृतात्म्यास शांती व वगरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button