Uncategorizedक्रीडाताज्या बातम्याशैक्षणिक

माळीनगरच्या विजय दादासाहेब लाटे याची राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

माळीनगर (बारामती झटका)

माळीनगर ता. माळशिरस येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला अँड ज्युनिअर कॉलेज माळीनगर या शाळेचा खेळाडू विजय दादासाहेब लाटे (इ. ११ वी, सायन्स) याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षे वयोगटामध्ये १०२ किलो खालील वजन गटात ७२ किलो वजन उचलून विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विजयची निवड शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली असून ही स्पर्धा दि. २८ जानेवारी ते दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल सांगली, या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. या स्पर्धेसाठी विजय दादासाहेब लाटे हा पुणे विभागाचा १७ वर्षाखालील १०२ किलो खालील वजन गटाचे प्रतिनिधित्व करीत आहे. माळीनगर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे दामोदर कृष्णाजी सोमन अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद (ठाणे विभाग) ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते ठाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून आठ विभागातील सर्व जिल्हे सहभागी झाले आहेत. क्रीडा शिक्षक रणजित लोहार यांचे मार्गदर्शन तर क्रीडा शिक्षक रितेश पांढरे, सिद्धेश्वर कोरे, मारुती आदलिंगे यांचे सहकार्य लाभले आहे. या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, उपाध्यक्ष प्रकाश गिरमे, सचिव ऍड. सचिन बधे, खजिनदार नितीन इनामके व सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे व सर्वांनी विजय लाटे याचे स्पर्धेसाठी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button