जनता विद्यालय, मळोली च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अभूतपूर्व यश

मळोली (बारामती झटका)
जनता विद्यालय मळोलीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत झळाळते यश मिळवून विद्यालयाचे नाव जिल्ह्यात उज्वल केले आहे. मुलींच्या गटामध्ये पाच विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची विभागीय स्तरासाठी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुमारी समीक्षा सचिन गायकवाड (४४ किलो), राजश्री राजकुमार रणदिवे (४९ किलो), समृद्धी सुभाष तांबे (५१ किलो), लक्ष्मी सतीश जाधव (५९ किलो) आणि श्रेया अमृतराव जाधव (६९ किलो) यांनी आपल्या दमदार खेळीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.

याशिवाय मुलांच्या गटामध्ये सहा विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटामध्ये तीन विद्यार्थिनींनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून एकूण १४ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत पदकांची कमाई केली. या सर्व विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन खेळाडू म्हणून नोकरीच्या संधी मिळवून उज्वल भविष्याची दारे खुली केली आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीतसिंह जाधव, मार्गदर्शक श्री. सत्यजित भैय्या जाधव, श्री. सुरेशदादा जाधव, श्री. प्रभाकर इंगळे सर देशमुख, श्री. पोपटराव काळे पाटील, श्री. संजय गुजर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तानाजी लवटे, पर्यवेक्षक श्री. पानसरे आणि सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. जाधव पी. एस. सर व श्री. जाधव एन. एस. सर यांनी कसून प्रशिक्षण दिले.
या ऐतिहासिक यशाबद्दल मळोलीच्या सरपंच सौ. अर्चनाताई जाधव, उपसरपंच श्री. महादेव नाना पवार तसेच सर्व ग्रामस्थ व पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



