छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव येथे विक्रमी 111 जणांचे रक्तदान..
निमगाव (बारामती झटका)
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 367 व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या निमगाव शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निमगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या शाखेत गेली 16 वर्षांपासून शंभू जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज दिवसभरात 111 तरुणांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. आजपर्यंत केलेल्या रक्तदानामध्ये यावर्षी तरुणांचा उत्साह अधिक होता या मुळेच यावर्षी विक्रमी 111 जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्याचे संचालक मा. रावसाहेब मगर व महाराष्ट्र केसरी रावसाहेब नाना मगर यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत मगर, नानाभाऊ मगर, आप्पासाहेब मगर, विराज मगर, दत्ता मगर (भैया), युवा नेते, दत्तूनाना मगर, ज्ञानेश्वर शेंडे, किसन पवार, ऋषिकेश मगर, विशाल मगर, ओंकार मगर, रामचंद्र मगर, आबा सावंत आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रतिक मगर, ओंकार मगर, शब्बीर मुलाणी, सुदर्शन मगर, आविष्कार गाडेकर, किशोर मगर, सत्यजित मगर आदींनी परिश्रम घेतले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng