वाघोली गावच्या सरपंच पदी सौ. वृषाली योगेश माने व उपसरपंच पदी श्री. पंडित विठ्ठल मिसाळ यांची बिनविरोध निवड
वाघोली (बारामती झटका)
वाघोली ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली होती. त्यात योगेश दिगंबर माने व इतर मान्यवर यांच्या नेतृत्वात खंडेराया ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे ११ पैकी ८ उमेदवार बहुमताने निवडून आलेले होते.
आज सरपंच व उपसरपंच पदाची निवड होऊन त्यात सरपंचपदी सौ.वृषाली योगेश माने यांचा एकमेव अर्ज व उपसरपंचपदी श्री. पंडित विठ्ठल मिसाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी संजय फिरमे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
अध्यासी अधिकारी यांना सहाय्यक म्हणून तलाठी संजय माने व ग्राम विकास अधिकारी धनश्री शिखरे यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने, अजित माने, डॉ. गिरीश माने यांनी सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामपंचायत अधिनियम हे पुस्तक देऊन सत्कार केला. सभेचे इतिवृत्त ग्राम विकास अधिकारी यांनी सभागृहात वाचून दाखवले. सर्व नवनिर्वाचित उमेदवार सौ. छाया भारत पाटोळे, श्री. लक्ष्मण दत्तू पारसे, सौ. सुजाता बळीराम मिसाळ, श्री. योगेश दिगंबर माने, सौ. रोहिणी अमोल मिसाळ व श्री. अविनाश गाडे या सर्व उमेदवारांचा सन्मान नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ. वृषाली माने व उपसरपंच पंडित मिसाळ यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानून गावचा विकास चांगल्या प्रकारे करू असे आश्वासन दिले.
सदर निवडी प्रसंगी मा.पंचायत समिती सदस्य विठ्ठल रामचंद्र पाटील, मा.चेअरमन विष्णू वासुदेव मिसाळ, वसंत कृष्णा मिसाळ, उत्तमराव माने, कालिदास कृष्णा मिसाळ, हरिदास कृष्णा चव्हाण, विलास मिसाळ, हरिदास बाबू मिसाळ, मारुती चांगदेव मिसाळ, अप्पासाहेब युवराज मिसाळ, सुरेश सर्जेराव पवार, पोपट भानुदास मिसाळ, मोहन विठ्ठल शेंडगे, संजय वसंत मिसाळ, दिगंबर माने, सुनील माने, बळीराम मिसाळ, रघुनाथ मिसाळ, अनंता श्रीरंग मिसाळ, हरिदास पाटोळे, निलेश शेंडगे, गणेश शेंडगे विजय शेंडगे, सौदागर पाटील, विवेक चव्हाण, प्रवीण पाटील, उत्तरेश्वर मिसाळ, राजेंद्र कोंडीबा मिसाळ, बाबुराव मिसाळ, पताळे पाटील व सर्व ग्रामस्थ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत प्रचारासाठी सहकार्य केलेल्या सर्व तरुण व जुन्या कार्यकर्त्यांचा व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सत्कार सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी केले व आभार उत्तमराव माने यांनी व्यक्त केले. प्रशासक धनश्री शिखरे यांनी त्यांच्याकडील कार्यभार सरपंच सौ. वृषाली योगेश माने व उपसरपंच पंडित मिसाळ यांच्याकडे हस्तांतरित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng