पंढरपूर येथे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण

स्वच्छता व सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा गौरव
पंढरपूर (बारामती झटका)
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. पायी वारी करताना स्वच्छता आणि विविध सामाजिक विषयांवर प्रभावी प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त दिंड्या पुढीलप्रमाणे –
🔹 प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्र. १३ (जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा)
पुरस्कार – ₹ १ लाखाचा धनादेश व सन्मानचिन्ह
🔹 द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्र. १९ (रथापुढे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा)
पुरस्कार – ₹ ७५ हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह
🔹 तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्र. २३ (रथामागे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा)
पुरस्कार – ₹ ५० हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात वारकरी संप्रदायाच्या योगदानाचे कौतुक करताना निर्मल दिंड्यांच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. “वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे, ती एक सामाजिक चळवळ आहे,” असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सौ. सोनिया गोरे, आमदार समाधान आवताडे, विठ्ठल रुक्मिणी समितीचे विश्वस्त, सर्व सदस्य आणि प्रशासनातील अधिकारी, वारकरी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



