Uncategorized
विजय युवराज सांगडे यांचे आकस्मित निधन

करमाळा (बारामती झटका)
मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव दत्तात्रय माने त्यांचे भाचे,तसेच अकलूजचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दिलीप युवराज सांगडे व माळशिरस तालुका मराठा सेवा संघाचे कार्यकारणी सदस्य व माळशिरस तालुका कर्मचारी सोसायटीचे संचालक वस्ताद भारत युवराज सांगडे यांचे लहान बंधू विजय युवराज सांगडे यांचे वयाच्या 47 व्या वर्षी आकस्मित निधन झाले. कैलासवासी विजय सांगळे यांचे पाश्चात आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार असून पुणे विभागाचे भुमिअभिलेख उपसंचालक श्री अनिल दत्तात्रेय माने यांचे ते भाचे होते. विजय सांगडे यांच्या आकस्मित निधनाने सांगडे परिवार यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कै विजय सांगडे अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 /7 /2023 रोजी निंभोरे (सांगडे वस्ती )तालुका करमाळा येथे सकाळी सात वाजता होणार आहे.