विजय लवटे युवकाचे जन्मगाव पिरळे मात्र कर्मभूमी माळशिरसमध्ये मित्र परिवारांच्यावतीने सन्मान संपन्न झाला…
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरसचे मार्गदर्शनाखाली ज्ञानसेतू अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले.
माळशिरस ( बारामती झटका )
पिरळे ता. माळशिरस येथील शेतकऱ्याचा मुलगा विजय भीमराव लवटे याने मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त या ठिकाणी झालेल्या पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केलेले असल्याने जन्मगाव पिरळे असले तरी कर्मभूमी माळशिरस शहरांमध्ये मित्र परिवारांच्यावतीने माळशिरस शहरातील द क्लासिक मोबाईल शॉपीमध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, युवा नेते महेश पाटील, क्लासिक मोबाईलचे मालक आनंद गारूळे, ओंकार काशीद, रोहित मदने, दिव्या फोटोग्राफीचे उत्कृष्ट फोटोग्राफर शशीराज म्हमाणे, संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पिरळे गावातील सौ. रतन व श्री. भिमराव नामदेव लवटे या शेतकरी दांपत्याच्या पोटी कार्य कर्तृत्ववान विजय लवटे यांनी जन्म घेतलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिकण्याची जिद्द, चिकाटीने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे, हा मनामध्ये उद्देश ठेवून लहानपणापासून संघर्षास सुरुवात केलेली होती. पहिली ते चौथीपर्यंत किर्दक वस्ती पिरळे येथे शिक्षण झालेले असून पाचवी ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा पिरळे, आठवी ते दहावी समता माध्यमिक विद्यालय पिरळे, अकरावी ते बारावी वालचंद विद्यालय कळंब येथे पूर्ण केले आहे. प्रतिकूल परिस्थिती असल्याने वसंतराव मुक्त विद्यापीठामध्ये 2019 साली पदवी पूर्ण केली.

लहानपणापासून खाकी वर्दी परिधान करायची, अशी मनाशी खुणगाठ बांधलेली होती. त्यासाठी संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. ज्ञानसेतु अभ्यासिकेचे पूर्णपणे सहकार्य राहिले. परिस्थितीची जाण आणि आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस भरतीच्यावेळी लाखो विद्यार्थी भरतीसाठी आलेली होते. त्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा विजय लवटे यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल माळशिरस शहरात सन्मान करण्यात आला. शशिकांत म्हमाणे यांनी तुराबाज फेटा बांधून बाळासाहेब सरगर व युवराज वाघमोडे यांनी सन्मान केला व आनंदाने पेढा भरविला. विजय लवटे यांनी विनयशीलता व नम्रता दाखवून बाळासाहेब सरगर यांना सुद्धा पेढा भरविला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
