Uncategorized

विठ्ठलवाडी येथे रामचंद्र भांगे व नेताजी उबाळे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांची भारत सरकारमान्य ग्रामीण विभागाच्या भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी व वाचनालयाचे सचिव तथा संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नेताजी उबाळे यांची माढा तालुका शिक्षकेतर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व हनुमंत पाटील मित्रमंडळ आणि वाचनालयाच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे दुध डेअरीचे चेअरमन हनुमंत पाटील व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उत्तम पालकर यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आदर्श शिक्षक तथा वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड म्हणाले की, रामचंद्र भांगे यांना जिल्हा व नेताजी उबाळे यांना तालुका पातळीवरील पद सन्मानपूर्वक मिळाले आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी गावाचा नावलौकिक नक्कीच उंचावला आहे. दोघांनीही आजतागायत आपापल्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे व नि:स्वार्थी भावनेने काम करून पदाला न्याय मिळवून दिला आहे, हीच अपेक्षा या नवीन पदांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण करावी. पदाचा दुरुपयोग न करता भ्रष्टाचार विरोधी मोहीम नेटाने राबवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नारायण खांडेकर, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे, महादेव कदम, धनाजी सस्ते, नेताजी कदम, अनंता जाधव, सत्यवान शेंडगे, ग्रामसेवक सुधाकर गव्हाणे, सतीश गुंड, सौदागर गव्हाणे, दिनेश गुंड, सज्जन मुळे, गोपीनाथ मस्के, सौदागर खरात, कैलास सस्ते, दिनकर कदम, बाळू खांडेकर, भिमराव नागटिळक, मोहन भांगे, शिवाजी कोकाटे, गोपीनाथ तरंगे, विश्वनाथ खा़ंडेकर, शिवाजी जाधव, पांडुरंग खांडेकर, राजेंद्र सस्ते, सतीश शेंडगे, ज्ञानेश्वर तरंगे, सतीश शिंगाडे, सुभाष सस्ते, दिपक भांगे, दत्तात्रय काशीद, सुरज शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button