विद्यमान सर्व संचालक मंडळाचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार – संतोष वाळूजकर
करमाळा (बारामती झटका)
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तांनी विनापरवाना गाळप केल्याबद्दल सात कोटीचा दंड केला आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे हे सर्व संचालक मंडळाचे अर्ज नामंजूर होणार असून शिवाय या प्रत्येक संचालकाकडे विठ्ठल रुक्मिणी पतसंस्था श्रीगोंदा यांची थकबाकी आहे. पॅनल प्रमुख दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्याकडे ब्रह्मदेव माने सहकारी बँकेची तसेच जनता सहकारी बँक उस्मानाबाद या दोन बँकेची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आहे हे सर्व थकबाकीदार असल्यामुळे बहुतांश सर्व विद्यमान संचालकाचे उमेदवारी अर्ज नामंजूर होणार असा दावा बजरंग दलाचे संघटन मंत्री संतोष वाळुंजकर यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संतोष वाळूजकर म्हणाले की, सतत दोन वर्ष मकाई कारखान्याला गाळप परवाना शासनाने दिला नव्हता. ऊसाला योग्य दर नाही, ऊस दिला तर पैसे वेळेवर मिळत नाहीत, ऊस उत्पादक सभासद मकाईला ऊस घालत नाही.
आज मकाई कारखान्याकडे शेतकऱ्याचे तीस कोटी रुपये येणे बाकी आहे. मात्र कारखान्यात एक किलो सुद्धा साखर शिल्लक नाही. यामुळे मकाई कारखान्याची निवडणूक सर्व ताकतीने आम्ही लढवणार असून आमच्या लढाईत प्राध्यापक रामदास झोळ आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली
मकाई कारखान्याची निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली असून कोणतीही माहिती सभासदाला देत नाहीत. मकाईचे सर्व संचालक थकबाकीदार असताना संबंधित सहकारी संस्थांकडून दाखले निवडणूक निर्णय अधिकारी मागवत नाहीत. कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची यादी देत नाहीत. याबाबत आम्ही सर्व तक्रारी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केले असून वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, wonderful blog structure! How long have you been blogging for?
you made running a blog glance easy. The entire look of
your web site is fantastic, let alone the content material!
You can see similar here ecommerce
Pretty! This was an extremely wonderful article.
Thanks for providing this info. I saw similar here: Sklep internetowy
What’s up, yeah this piece of writing is really nice and I have learned lot of things from
it regarding blogging. thanks. I saw similar here: E-commerce