डॉ. शिवाजी पनासे पाटील मित्र परिवार यांच्यावतीने राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती व पत्रकार बांधवांचा सन्मान संपन्न
वेळापूर (बारामती झटका)
आज राजमाता माॅं जिजाऊ साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती व पत्रकार बांधव यांचा सन्मान डाॅ. शिवाजी पनासे-पाटील मित्र परिवार यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी महादेव देवालय ट्रस्टीचे प्रमुख अमृतभैय्या माने-देशमुख, धनंजय माने-देशमुख (धनुभैय्या) वेळापुर गावचे माजी उपसरपंच शंकरराव काकुळे, वेळापुर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य अमृतराव माने-देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिपक राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, भैय्या खोरे, भैय्या इनामदार, ग्रामपंचायत सदस्य डाॅ. शिवाजी पनासे-पाटील, भाजपा वेळापुर शहराध्यक्ष संजय पनासे, शरद साठे, इसाक पठाण, शंकरराव माने-देशमुख, अजय शिंदे, अशोक साबळे, सूर्यकांत पनासे, महावीर पनासे, मारूतीनाना पनासे, सतिश धोत्रे, महेंद्र साठे, बाॅबी वाघमारे, सतीश नवले सर, दादा साठे सर, महेश साठे, भाऊ थोरात, गजेंद्र वाघमारे, संजय कांबळे, महादेव नाईकनवरे, प्रविण साठे, अतुल साठे, राहुल दणाणे, विशाल नाईकनवरे, विशाल गायकवाड, निलेश नाईकनवरे, ॠषी साठे, विष्णू नाईकनवरे आदी उपस्थित होते.

तसेच या वेळी कै. अॅड. शहाजी पांडूरंग पनासेपाटील यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिलीप बनसोडे, किरण जाधव, श्रीनिवास कदम-पाटील, डि. एस. गायकवाड, अशोक पवार, शिवाजी मंडले, गणेश जामदार, ओंकार आडत, अमोल साठे, सचिन रणदिवे यांचा सन्मानचिन्ह, हार, डायरी व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अविनाश साठे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
