ताज्या बातम्याशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी ज्ञानाची कास धरावी – श्री. अनिकेत माने देशमुख

वेळापूर (बारामती झटका)

ज्ञान ही एक शक्ती असून विद्यार्थ्यांनी एका हातात पुस्तक व दुसर्‍या हातात गुरुजींचा हात धरुन वाटचाल करावी. तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल, असे प्रतिपादन एम.पी.एस.सी. परीक्षेत राज्यात प्रथम आलेले श्री. अनिकेत माने देशमुख यांनी केले. शेरी नं. १ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेरी नं. १ जिल्हा परिषदेच्या शाळेत भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रकाश माने देशमुख, श्री. अनिकेत माने देशमुख व श्री. संदीप जाधव हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी यांनी केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा थोडक्यात आढावा घेताना शाळेच्या प्रगतीवरही प्रकाश टाकला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कमलाकर माने देशमुख यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी साहित्य कवायत सादर केली. यावेळी इयत्ता आठवीतील कु. श्रेया संदीप माने देशमुख व कु. कोमल सुनिल थोरात या विद्यार्थीनींनी लिहिलेल्या “पर्‍यांची दुनिया” या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विज्ञान शिक्षक श्री. पांडुरंग वाघ सर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या विज्ञान फलकाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. चि. शौर्य संदीप माने देशमुख याचा ॲबॅकस स्पर्धेतील यशाबद्दल व चि. आर्यन मिलिंद माने देशमुख याचा बुध्दिबळ स्पर्धेतील यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. आय चॅम्प ॲबॅकस वेळापूरच्या प्रमुख सौ. सुनेत्रा माने देशमुख व श्री. मिलिंद माने देशमुख यांना बेस्ट स्टार्टअप टीचर ॲवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी यांना कोल्हापूर येथील साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेने घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तसेच यावेळी शाळेतील बालकलाकारांनी विविध नृत्ये सादर केली. पुलवामा दुर्घटनेवर आधारीत गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी श्री. देविदास विठ्ठल नवगण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने शाळेस साऊंडसिस्टीम भेट देण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कमलाकर माने देशमुख यांनी शाळेच्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेचे पालक श्री. रशीद शेख, श्री. कमलाकर माने देशमुख, श्री. संदीप माने देशमुख व श्री. विराज घार्गे यांच्यावतीने सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतील नूतन शिक्षिका रेशमा खान मॅडम यांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग वाघ सर यांनी केले तर आभार श्री. प्रदीप कोरेकर यांनी मानले. यावेळी मेजर हिंमतराव माने देशमुख, श्री. धैर्यशील माने देशमुख, श्री. उदयसिंह माने देशमुख, श्री. कल्याणराव माने देशमुख, अजित माने देशमुख, रोहित माने देशमुख, दत्तात्रय केंगार, लखन खुडे, चंद्रकांत मोरे, शितल खुडे, सुलोचना पवार, यांच्यासह महिला व पुरुष पालक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button