विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची देवगिरी बंगल्यावर युवानेते अक्षयभैया भांड यांनी सदिच्छा भेट घेतली.
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व नातेपुते गावचे युवा नेते पैलवान अक्षयभैय्या भांड यांनी सदिच्छा भेट घेऊन अजितदादांचा घोंगडी व गुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी अजितदादा पवार यांच्यात व अक्षय भैय्या भांड यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होवून माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरपंचायतसाठी विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. अजितदादा यांचे आणि भांड परिवार यांचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत. राष्ट्रवादीमधून अनेकजण भाजपमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये यशस्वीपणे सांभाळण्याचे काम युवकांच्या माध्यमातून अक्षय भैय्या भांड यांनी केलेले होते. अजितदादा यांचे भेटीसाठी अक्षय भांड यांना कायमस्वरूपी प्राधान्य दिले जाते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng