वेळापूरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी !!
वेळापूर (बारामती झटका)
शनिवार दि. २२/४/२०२३ रोजी शिशु मंदीर येथे परशुराम जयंती ब्राह्मण सेवा संघ १ तर्फे उत्साहात साजरी झाली. यात श्री. तेरखेडकर सर यांनी प्रथम कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्यानंतर डॉ. श्रीकर देशपांडे यांनी भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर कोवीड काळात मोलाचे कार्य केलेले डाॅ. श्रीकर देशपांडे व डॉ. सौ. स्मिता देशपांडे यांचा श्री. रत्नाकर जवळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सौ. सरिता रत्नाकर जवळेकर यांनी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सौ. विजया इनामदार यांचे हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करणेत आला. यानंतर वेळापूर पोलीस स्टेशनचे पो. काँ. श्री. विजय देशपांडे यांची पोलीस नाईक पदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा डाॅ. श्रीकर देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सौ. श्रद्धा जोशी यांचा जोतिष विशारद पंडीत ही पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचा सौ. रचना रविंद्र जवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच वेळापूर येथील जेष्ठ नागरिक विनायक पाठक यांचा ८१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच श्री. चैतन्य इनामदार यांचे चि. तन्मय याचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेषतः श्रीधर देशपांडे, रविंद्र जवळेकर, नंदकुमार कुलकर्णी, श्रीकांत तानवडे, चैतन्य इनामदार, बाळासो इनामदार, रत्नाकर इनामदार, सुनिल कुलकर्णी, ज्ञानेश कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, विश्वेश देशपांडे, श्रीपाद अराध्ये, संकेत अराध्ये, आनंद देशपांडे, हेमंत जोशी, योगेश भागवत, सुधाकर इनामदार, संचित जवळेकर, मंदार जवळेकर, श्रीनाथ देशपांडे, आनंद तानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास ब्राह्मण महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तसेच श्री. प्रकाश माळवदकर, शंकर माने-देशमुख, संजय उरणे, प्रशांत महासागर व इतर पुरूष ही मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng