राजनंदिनी पालवे ची जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बारामती (बारामती झटका)
दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी मुंबई क्राईस्ट अकॅडमी स्कुल, कोपरखैरणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामतीच्या राजनंदिनी ची पुणे ग्रामीण संघात निवड झालेली होती. तिने रेग्यु आणि फाईट या दोन इव्हेंट मध्ये सहभाग नोंदवला होता. फाईट इव्हेन्ट मध्ये तिने सांगली जिल्ह्याच्या खेळाडूला तीन पॉईंट ने हरवून आपले स्थान निश्चित केले. व रेग्यु मध्ये महाराष्ट्रमधील एकूण 5 संघला मागे टाकत गोल्ड पदक मिळवले. राजनंदिनीनीने ज्युनियर गटात आपला दबदबा कायम ठेवत जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. राष्ट्रीय स्पर्धा 15 ते 19 नोव्हेंबर मध्ये श्रीनगर या राज्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून एकूण 15 खेळाडूंची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत अतिशय कडवी झुंज राजनंदिनीला द्यावी लागली. यासाठी तिने बारामती सूर्यनगरी या ठिकाणी योद्धा स्पोर्ट्स क्लबला कठोर प्रॅक्टिस करत व मेहनत घेऊन आपल्या आई वडिलांची मान अभिमानाने उंचावली, अशी माहिती योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा साहेबराव ओहोळ यांनी दिली.

पिंच्याक सिलेट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून (१) इंडिंग (फाईड) (२) तुगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट), (५) सीलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० हा या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला “युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविदयालय संच”, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कांउसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, पुथ गेम व ऐशियन थिय गेम, भारतीय विश्वविदयालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७ च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता.
जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणारी राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धा सेंट्रल स्पोर्ट्स मिनिस्ट्री युथ अफेर्स यांच्या गाईडलाईन ने पार पडणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.