वेळापूर येथील सौ. मालन भानुदास मुंगूसकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
ग्रामविकास अधिकारी सुधाकर मुंगूसकर यांना मातृषोक..
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथील सौ. मालनताई भानुदास मुंगूसकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजता अकलूज येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, चार मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संग्रामनगर व सुळेवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी सुधाकर मुंगूसकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर वेळापूर धानोरे रोडवरील मुंगूसकर वस्ती येथील राहत्या घरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.
स्व. मालनताई मुंगूसकर सुसंस्कृत, मनमिळावू स्वभाव आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा रक्षाविसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता होणार आहे. स्व सौ. मालनताई मावशी यांच्या आत्म्यास शांती लाभो व मुंगूसकर परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency