Uncategorizedताज्या बातम्या

वेळापूर येथे इंगवले देशमुख यांच्या श्री गणेश पेट्रोलियमचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथे इंगवले देशमुख यांच्या इंडियन ऑइल कंपनीच्या श्री गणेश पेट्रोलियमचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सोमवार दि. २९/८/२०२२ रोजी सकाळी १०.१० मिनिटांनी वेळापूर घुमेरा येथे होणार आहे. तर यावेळी माजी सहकार व सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी कुस्तीगीर परिषदेचे संघटक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकरनगरचे संचालक पै. मल्लसम्राट रावसाहेब मगर, निरा भीमा साखर कारखान्याचे माजी संचालक नागेश नष्टे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकरनगरचे संचालक शंकरराव माने देशमुख, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे चीफ मॅनेजर जी. के. देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख, म्हसवडचे माजी उपनगराध्यक्ष धनाजी माने, श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट वेळापूरचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे मॅनेजर व्ही. बी. खंदारे, संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, प्रगतशील बागायतदार बलभीम घोगरे पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य रणजीतसिंह जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न होणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रावसाहेब इंगवले देशमुख, शंकर नगर येथील ग्रीन फिंगर्स स्कूलचे चेअरमन नितीनशेठ इंगवले देशमुख, खंडाळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्तात्रय इंगोले देशमुख यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button