वेळापूर येथे तानाजी साबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये घराचे स्वप्न केले साकार…
तानाजी साबळे यांचे घररूपी स्वप्न झाले पूर्ण…
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथे गुरुवार दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी श्री. तानाजी साबळे यांच्या नवीन घराची वास्तुशांती पार पडली. तानाजी साबळे हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या बांधकाम विभाग, अकलूज येथे कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुलाबाळांना राहण्यासाठी दिमाखदार घर असावे, असे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी सेवानिवृत्तीच्या काळानंतर जी काही आयुष्याची जमापुंजी मिळाली ती खर्च करून नवीन वास्तू बांधली आणि त्याचीच वास्तुशांती आज पार पडली.
याप्रसंगी वास्तुशांतीसाठी व सदिच्छा भेट म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार पै. महेश दादा किसनराव लांडगे यांचे बंधू व पिंपरी चिंचवड शहरातील युवा उद्योजक श्री. कार्तिक शेठ किसनराव लांडगे, श्री. शेखर आबा लांडगे, श्री. मुकेश भाऊ लोंढे, आमदार कार्यालय प्रमुख श्री. सचिन लांडगे, उद्योजक श्री. अमित परदेशी तसेच वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. अमरसिंह माने देशमुख, श्री. पोपट साबळे, श्री. अशोक साबळे आदी मान्यवरांसहीत नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी श्री. तानाजी साबळे यांना शुभेच्छा दिल्या.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

